रस्त्यावरील कुत्र्याची आयफामध्ये एन्ट्री, दिली मुलाखत, हा व्हिडिओ जिंकेल तुमचं मन

सोहळ्यात अनेक मजेशीर घटना घडत होत्या. त्यात भर पडली एका कुत्र्याच्या एन्ट्रीमुळे. अभिनेता सलमान खानच्या पाठोपाठ एका कुत्र्यानं देखील आयफा सोहळ्यात एन्ट्री घेतली.

SHARE

आयफा पुरस्कार सोहळा बॉलिवूड कलाकारांच्या स्टाईलमुळे दरवर्षी चर्चेत असतो. यावर्षी मात्र आहफा सोहळा चर्चेत येण्यामागं वेगळंच कारण आहे. सध्या सोशल मीडियावर याचीच जोरदार चर्चा आहे. तुम्ही म्हणाल एवढं चर्चा करण्यासारखं काय झालं? जास्तीत जास्त काय तर एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री हॉट दिसत असतील. नाहीतर कुणी काय घातलं यावर चर्चा चालू असेल, असंच तुम्हाला वाटत असेल. पण असं नाही. यंदा चर्चेचं नेमकं कारण आहे सोहळ्यात आलेला एक खास पाहुणा. हा खास पाहुणा होता एक कुत्रा...स्पेशल गेस्ट

सोहळ्यात अनेक मजेशीर घटना घडत होत्या. त्यात भर पडली एका कुत्र्याच्या एन्ट्रीमुळे. अभिनेता सलमान खानच्या पाठोपाठ एका कुत्र्यानं देखील आयफा सोहळ्यात एन्ट्री घेतली. कुणाला कळायच्या आधीच कुत्रा ग्रीन कार्पेटवर चालत चालत आत शिरला. हे पाहून तिथले वॉलेंटियर अचंबित झाले. नेमका हा कुत्रा कुठून आला? कसा आला असे प्रश्न सर्वांनाच पडत होते.View this post on Instagram

Spread love! 🐶❤️

A post shared by Aditi Bhatia 🎭 (@aditi_bhatia4) on


जेव्हा कुत्र्याची मुलाखत होते

ग्रीन कार्पेटवर येणाऱ्या अभिनेता आणि अभिनेत्रींची मुलाखत टीव्ही अभिनेत्री आदिती भाटीया घेत होती. आता ग्रीन कार्पेटवर वेगळा पाहुणा आल्यावर आदितीला देखील मुलाखत घेण्यापासून स्वत:ला रोखता आलं नाही. अखेर तिनं त्या कुत्र्याची मुलाखत घेतली. या गंमतीशीर मुलाखतीचा व्हिडीओ तिनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर देखील शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड होत आहे.

तुला सलमान खानचा पाठलाग करुन कसं वाटलं? तुला या पुरस्कार सोहळ्यात येऊन कसं वाटलं? तुला कोणत्या व्यक्तिरेखेसाठी पुरस्कार मिळेल असं वाटतं? यांसारखे अनेक प्रश्न अदितीनं त्या कुत्र्याला विचारले. या तिच्या प्रश्नांवर कुत्र्यानं आपला पंजा पुढे करून सेकहँड केले. 
संबंधित विषय
ताज्या बातम्या