दिपिकासह श्रद्धा, सारा, रकुल प्रितला कोरोना चाचणी करण्याचे आदेश

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी ड्रग्ज अँगलचा तपास करणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB)च्या २० अधिकारी आणि कर्मचा-यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

गेल्या एका आठवड्यात ज्या लोकांची टीमनं चौकशी केली किंवा ज्यांना ते भेटले, त्या सर्वांना कोविड टेस्ट करण्यास सांगण्यात आलं आहे. यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंग यांचा समावेश आहे.

सोमवारी संध्याकाळी अधिकाऱ्यांचे रिपोर्ट आल्यानंतर एनसीबीची अतिरिक्त टीम मुंबईत बोलावण्यात आली आहे. यामध्ये अहमदाबाद, इंदूर, बेंगळुरू आणि चेन्नई येथील अधिका-यांचा समावेश आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कोरोना पॉझिटिव्ह असणा-यांमध्ये बरेच मोठे अधिकारीही आहेत. गेस्ट हाऊसमध्ये मुंबईबाहेरील अधिका-यांना क्वारंटाइन ठेवण्यात आलं आहे.

एक्सचेंज बिल्डिंगमधील एनसीबी कार्यालयातील चार कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले. तेव्हा संपूर्ण कार्यालय काही दिवस बंद होते. एनसीबीच्या दोन टीम बॉलिवूडमध्ये ड्रग्ज अँगलचा शोध घेत आहेत.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशी संबंधित ड्रग्स अँगलची चौकशी एनसीबी कार्यालयात सुरू होती आणि गेट वे ऑफ इंडियाजवळील गेस्ट हाऊसमध्ये बॉलिवूडमधील ड्रग्ज अँगलची चौकशी केली जात आहे.


हेही वाचा

युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या पुरस्कारानं सोनू सूद सन्मानित

सुशांतच्या शरीरात कोणतेही विषारी अंश सापडले नाहीत, एम्सचा खुलासा

पुढील बातमी
इतर बातम्या