Advertisement

युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या पुरस्कारानं सोनू सूद सन्मानित

सोनू सूदला युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (UNDP) कडून प्रतिष्ठित एसडीजी विशेष मानवतावादी कृती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.

युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या पुरस्कारानं सोनू सूद सन्मानित
SHARES

सोनू सूद गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटांमुळे नाही तर त्याच्या मदतकार्यामुळे चर्चेत आहे. कोरोना काळात सोनू सूद गरजूंसाठी देवदूत ठरला. त्यानं विविध माध्यमातून गरजुंना मदत केली. या कार्याबद्दल सोनू सूदला युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (UNDP) कडून प्रतिष्ठित एसडीजी विशेष मानवतावादी कृती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.

29 सप्टेंबर 2020 रोजी संध्याकाळी व्हर्ज्युअल कार्यक्रमात हा पुरस्कार सोनूला प्रदान करण्यात आला. यापूर्वी या पुरस्कारानं एंजेलिना जोली, डेव्हिड बेकहॅम, लिओनार्डो डिकॅप्रियो, एम्मा वॉटसन, लियाम नीसन, केट ब्लँशेट, अँटोनियो बांदरेस, निकोल किडमॅन आणि प्रियांका चोप्रा या सेलिब्रिटींना संयुक्त राष्ट्रांच्या विविध संघटनांनी सन्मानित केलं आहे.

'हा एक दुर्मिळ सन्मान आहे. युनायटेड नेशन्सची ओळख खूप खास आहे. मी सर्व काही माझ्या देशवासीयांकडून कोणत्याही प्रकारच्या अपेक्षा न ठेवता केलं,' असं पुरस्कार प्राप्त केल्यानंतर सोनू सूद म्हणाला.

कोरोनाच्या काळात देशभर लॉकडाऊन लागू झाला आणि मग स्थलांतरित मजूर आपापल्या गावी परतण्यासाठी धडपडू लागले. या मजुरांना घरी पोहोचवण्याची सोय सोनूनं केली. प्रवासी मजुरांना नवीन काम मिळावं याकरिता 'प्रवासी रोजगार' अ‍ॅप लाँच केलं. आजही त्याचं मदतकार्य सुरू आहे.हेही वाचा

सुशांतच्या शरीरात कोणतेही विषारी अंश सापडले नाहीत, एम्सचा खुलासा

...म्हणून दीपिका, श्रद्धा आणि साराच्या जाहिराती थांबवण्याचा निर्णय

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement