Advertisement

सुशांतच्या शरीरात कोणतेही विषारी अंश सापडले नाहीत, एम्सचा खुलासा

एम्सने कूपर रुग्णालयाने सादर केलेल्या शवविच्छेदन अहवालाला मात्र अद्याप क्लिन चिट दिलेली नाही.

सुशांतच्या शरीरात कोणतेही विषारी अंश सापडले नाहीत, एम्सचा खुलासा
SHARES

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात एम्सने  सीबीआयकडे अहवाल सादर केला आहे. या अहवालात सुशांतच्या शरीरात कोणतेही विषारी अंश सापडले नसल्याचा खुलासा एम्सने केला आहे. मात्र दुसरीकडे कूपर रुग्णालयाने सादर केलेल्या अहवालाला मात्र क्लिन चिट दिलेली नाही. कूपर रुग्णालयातील पाच डाँक्टरांनी सुशांतचे शवविच्छेदन केले होते. त्या अहवालावर एम्स समाधानी नसल्याचे कळते.

सुशांच्या विसेरा रिपोर्टमध्ये न्यायवैद्यक प्रयोग शाळेतील (Forensic Laboratory) डाॅक्टरांनी सुशांतच्या पोट(जटर)चा काही भाग, पोटातील आतडी, यकृतचा काही भाग, पित्ताशय, किडनी, १० एमएल रक्त, डोक्यावरील केस हे न्यायवैद्यक प्रयोग शाळेत तपासण्यात आले. त्यावेळी डाँक्टरांना विसेरा रिपोर्टमध्ये काही केमिकल अंश मिळून आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले होते. या केमिकल अंशाबाबत एम्सच्या डाँक्टरांनी आता सीबीआयला अहवाल सादर केला असून त्यात त्यांनी कोणतेही विषारी अंश मिळाले नसल्याचे म्हटले आहे.

 हेही वाचा:- मराठा आरक्षणावरची अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी न्यायालयात अर्ज

सुशांत सिंग राजपूत मृत्यूचा तपास (Suicide case) करत असलेल्या सीबीआयने तपास सुरू केला. एक महिन्याच्या तपासानंतरही सीबीआयच्या हाती काहीचं विशेष असं लागलं नाही. या रिपोर्टमुळे सीबीआयला किती मदत होईल हे येणारा काळचं ठरवेल. विसरा तपासणीसाठी टॉक्सिकॉलॉजी व्यतिरिक्त हिस्टो पथोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री डिपार्टमेंट फोरन्सिक एक्स्पर्ट डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली हा तपास सुरू आहे. दरम्यान एम्सने कूपर रुग्णालयाने सादर केलेल्या शवविच्छेदन अहवालाला मात्र अद्याप क्लिन चिट मिळालेली नाही. त्यामुळे आता पुढे त्यावरून नवीन काय गोष्टी पुढे येतात हे पाहणे ओत्सुक्याचे ठरणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement