Advertisement

मराठा आरक्षणावरची अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी न्यायालयात अर्ज

मराठा आरक्षणावरची अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे.

मराठा आरक्षणावरची अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी न्यायालयात अर्ज
SHARES

मराठा आरक्षणावरची अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे. मराठा आरक्षण संदर्भात सोमवारी मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा इथं बैठक पार पडली. 

अशोक चव्हाण म्हणाले, की अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारनं सोमवारी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला आहे. स्थगिती निरस्त (vacate) करण्यासाठी अर्ज दाखल करणं ही प्रक्रिया आहे. यावर पुढे सुनावणी होईल. आम्ही एक टप्पा पुढे गेलो आहोत. उद्या किंवा परवा मुख्यमंत्री याबाबत भूमिका मांडतील.

ते पुढे म्हणाले की, स्थगिती उठण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत, त्याची माहिती पवारांना दिली त्यांचाशी चर्चा केली. त्यांनीही आपली मतं मांडली. सर्वोच्च न्यायालयात जायचं आहे त्याची तयारी सुरू आहे. कायदेशीर मुद्दे आहेत, त्याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाली आहे. आपण न्यायालयात जातो आहेच, घटनापीठ लवकर स्थापन व्हावं यासाठी आपण मुख्य न्यायमूर्तींकडे प्रयत्न करतोय.

मराठा समाजाच्या आरक्षणाला अंतरिम स्थगिती देत हे प्रकरण सुनावणीसाठी मोठ्या पीठाकडे देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला. स्थगितीच्या निर्णयामुळे निर्माण झालेला तिढा सोडवण्याच्या दृष्टीनं विरोधी पक्षांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागच्या बुधवारी बैठक घेतली होती. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका सगळ्याच पक्षांनी घेतली.

बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री अनिल परब शेकापचे जयंत पाटील उपस्थित होते.


हेही वाचा

तर, खासदारकीचा राजीनामा देईन, उदयनराजेंचा इशारा

मुख्यमंत्र्यांनी मोठा वाद टाळला, आंबेडकर स्मारक पायाभरणीचा कार्यक्रम पुढे ढकलला

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा