सुशांत आत्महत्या प्रकरण: एनसीबीचे मुंबईत विविध ठिकाणी छापे

या छाप्यात एनसीबीकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केले आहेत. तर काही तस्करांची नावे पुढे आली असून एनसीबीचे अधिकाऱी त्यांच्या मागावर आहेत

सुशांत आत्महत्या प्रकरण: एनसीबीचे मुंबईत विविध ठिकाणी छापे
SHARES

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणात एनसीबीने मुंबईतल्या विविध ठिकाणी आज छापेमारी केली.  या प्रकरणात एनसीबीने रिया चक्रवर्ती विरोधात फास आवळण्यास एनसीबीने सुरूवात केली आहे.  या कारवाईतून मोठ्या यश मिळण्याची अपेक्षा असल्याचे नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या (एनसीबी) अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. या संपूर्ण कारवाईसंदर्भात सूत्रांनी सांगितले की, या छाप्यात एनसीबीकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केले आहेत. तर काही तस्करांची नावे पुढे आली असून एनसीबीचे अधिकाऱी त्यांच्या मागावर आहेत.

हेही वाचाः- आलिशान गाड्यांमधून केली जायची ड्रग्ज तस्करी, आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक खुलासा

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यामुळे या गुन्ह्यांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असल्याने  त्यानुसार अटक आरोपींची संख्या ही वाढत आहे. त्यामुळेच या गुन्ह्यात तपासासाठी एनसीबीने मुंबईबाहेरील अतिरिक्त पथकांची या गुन्ह्यांच्यां तपासासाठी मदत घेत आहेत. नुकतीच एनसीबीची एक टिम गुजरातच्या अहमदाबादहून मुंबईला पोहचली आहे. सुशांत आत्महत्या प्रकरणात रिया आणि शौविकच्या अटकेनंतर बॉलिवूडमधील ड्रग्जचे व्यसन करणारे अनेक कलाकार एनसीबीच्या रडारवर आले आहेत.  आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीवरून एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईसह गोवा मध्ये ड्रग्जची तस्करी करणाऱ्यांची माहिती मिळवल्याचे कळते. या प्रकरणात आतापर्यंत ७ तस्करांना एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.

हेही वाचाः-रिया चक्रवर्तीचा मोठा खुलासा, सुशांतला ‘या’ व्यक्तींमुळे लागली ड्रग्जची सवय

या प्रकरणात ड्रग्ज अॅगल पुढे आल्यानंतर सफेद पावडरची तस्करी करणाऱ्यांची झोप उडाली आहे. गुरूवारी मुंबईच्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईसह गोवामध्ये केलेल्या छापेमारी मुळे अनेक तस्करांचे धाबे दणाणले आहेत. या व्यवसायाशी संबंधित सात डीलर्स आणि ड्रग्ज विक्रेत्यांना एनसीबीच्या छापेमारीत पकडले, तर मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सामानही एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी हस्तगत केले आहे. याप्रकरणात अटक करण्यात आलेले ड्रग तस्कर आणि चक्रवर्ती भावंडांच्या कबुलीजबाबानंतर एनसीबीने ही कारवाई केल्याचे सांगितले जाते.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा