COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,44,063
Recovered:
47,67,053
Deaths:
80,512
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
36,674
1,447
Maharashtra
4,94,032
34,848

रिया चक्रवर्तीचा मोठा खुलासा, सुशांतला ‘या’ व्यक्तींमुळे लागली ड्रग्जची सवय

बाँलीवूडमधील अनेक सेलिब्रिटी या ड्रग्जच्या व्यसनात अडकलेले आहेत. रियाने चौकशी बाँलीवूडमधील ड्रग्जचे सेवन करणारे आणि बाळगणाऱ्या २५ कलाकारांची नावे एनसीबीला दिल्याचे कळते.

रिया चक्रवर्तीचा मोठा खुलासा, सुशांतला ‘या’ व्यक्तींमुळे लागली ड्रग्जची सवय
SHARES

सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूच्या प्रकरणात ड्रग्स अँगल समोर आल्यानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी)ने धरपकड सुरू केली आहे. या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सुशांतसिंग राजपूतला कुठे  आणि कुणी मादक पदार्थांच्या व्यसनाची सवय लागली याचा खुलासा रिया चक्रवर्तीने केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हेही वाचाः- 'के' फाॅर काही का असेना, लक्षात ठेवा फक्त 'सी' फाॅर कोरोना!

सुशांतला ड्रग्ज देणे आणि जवळ बाळगण्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या रिया चक्रवर्तीने अनेक खुलासे केले आहेत. बॉलिवूडच्या एका बड्या निर्माते-दिग्दर्शकामुळे सुशांतला नशेची लत लागल्याची माहिती रियाने एनसीबीच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. ती व्यक्ती वेळोवेळी सुशांतला अशा पार्टीमध्ये घेऊन जायची. ज्या पार्टीत ठिकाणी अंमली पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जायचे, त्या पार्टीत सुशांत कोकेन, गांजा, एलएसजी या पदार्थाचे सेवन करायचा. सुशांतने रियाला याबाबत सांगितले होते, बाँलीवूडमधील अनेक सेलिब्रिटी या ड्रग्जच्या व्यसनात अडकलेले आहेत. रियाने चौकशी बाँलीवूडमधील ड्रग्जचे सेवन करणारे आणि बाळगणाऱ्या २५ कलाकारांची नावे एनसीबीला दिल्याचे कळते. त्यात एका बड्या निर्मातामुळे सुशांतला ही सवय लागल्याचा खुलासा तिने एनसीबीच्या अधिकाऱ्यांसमोर केला आहे.

हेही वाचाः- सर्वसामान्य रेल्वेतून करू शकतात प्रवास? लवकरच निर्णय होण्याची शक्यता

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात एनसीबीने नुकतीच करण जीत सिंह आनंद (२३) याला दादर येथून अटक केली आहे. त्याच्याजवळून एनसीबीने गांजा आणि चरस हे अंमली पदार्थ तपास अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत. त्याच्या चौकशीतून पुढे अंकुश अर्नेजा आणि अनुज केशवानी याला अटक करण्यात आली आहे. हे तिघेही ड्रग्ज तस्करीसाठी सक्रीय होते. आनंदकडून ५०० ग्रॅम, तर उर्वरित दोन आरोपींकडून ४२ ग्रॅमचे  चरस आणि १२ हजार रुपये तपास अधिकाऱ्यांनी हस्तगत केले आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा