Advertisement

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ईडीने फास आवळला

ईडीने या प्रकरणाभोवती फास आवळण्यास सुरूवात केली. रिया आणि तिच्या कुटुंबियांची दोन दिवस चौकशी पूर्ण झाल्यानंतर ईडीने सुशांतच्या घरातील दोन नोकर आणि सुरक्षा रक्षकाला चौकशीसाठी समन्सस बजावल्याचे कळते.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ईडीने फास आवळला
SHARES

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहे. आतातर त्यात राजकारणी नेत्यांनी उडी घेतल्याने दररोज आरोप प्रत्यारोपाच्या फैरी घडत आहेत. अशातच ईडीने या प्रकरणाभोवती फास आवळण्यास सुरूवात केली. रिया आणि तिच्या कुटुंबियांची दोन दिवस चौकशी पूर्ण झाल्यानंतर ईडीने सुशांतच्या घरातील दोन नोकर आणि सुरक्षा रक्षकाला चौकशीसाठी समन्सस बजावल्याचे कळते.

हेही वाचाः- Gunjan Saxena The Kargil Girl review : 'ती'च्या स्वप्नांची गरुडझेप

सुशांतच्या आत्महत्येला आता दोन महिने पूर्ण होत आले. मात्र आजही सुशांतने आत्महत्या का केली हे अद्याप गुलदस्त्यात आहेत. सुशांतने ज्या वेळी आत्महत्या केली. त्यावेळी घरात सुशांतचा मित्र सिद्धार्थ, दोन नोकर आणि इमारतीबाहेर सुरक्षा रक्षक हे उपस्थित होते. त्यापैकी सिद्धार्थची ईडीने चौकशी केली. तसेच सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्ती, रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांची चौकशी करण्यात आलेली आहे.  या चौकशी दरम्यान सुशांतसिंह राजपूतच्या कुठल्याही पैशाचा वापर आपण स्वतःसाठी केला नसल्याचे रिया चक्रवर्तीने ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे. मुंबई व मुंबई बाहेर जी काही संपत्ती आपण विकत घेतलेली आहे, ती स्वतःच्या पैशाने विकत घेतल्याचे ही रिया चक्रवर्तीने ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

हेही वाचाः- खासदार नवनीत राणा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील रुग्णालयात हलवण्याचा निर्णय

त्या दिवशी नेमकं काय झालं, सुशांत का नैराक्षेत होता. कुणी त्याच्यावर दबाव टाकत होतं का, रियासोबत काही आर्थिक व्यवहार  झाला होता का? तसेच त्यांना मिळणाऱ्या पैशांबाबत ईडी चौकशी करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा