Advertisement

Gunjan Saxena The Kargil Girl review : 'ती'च्या स्वप्नांची गरुडझेप

बुधवारी जान्हवी कपूर, पंकज त्रीपाठी, अंगत बेदी यांच्या प्रमुख भूमिका असलेला गुंजन सक्सेना द कारर्गिल गर्ल चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जाणून घ्या हा चित्रपट कसा आहे तो....

Gunjan Saxena The Kargil Girl review : 'ती'च्या स्वप्नांची गरुडझेप
SHARES

हे तुला जमणार नाही, हे तुझं काम नाही, पुरुषांची कामं पुरुषांनीच केलेली बरी, हममम... मुलगी मोठी झाली लग्नाचं बघा तिच्या, जेवण येतं का मुलीला? करीअर वैगरे ठिक आहे पण नवऱ्याला वेगवेगळे पदार्थ करून घातले पाहिजेत की नाही, अरे तिला प्रमोशन मिळालं नक्कीच कॉप्रोमाईज केला असेल अशी वाक्य आता प्रत्येक स्त्रीला ऐकण्याची सवय झाली असेल.

२१ वं मॉर्डन शतक असं जरी आपण मिरवत असलो तरी आजही अशा बुरसटलेल्या विचारधारा आपल्या आसपास वावरतातच. मात्र स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात स्वत:चं अस्तित्व सिद्ध केलं आहे, आजही करतेय आणि पुढेही करेलच.

स्वत:च्या अस्तित्वासाठी लढणाऱ्या अशाच एका मुलीची प्रेरणादायी कथा गुंजन सक्सेना (Gunjan Saxena The Kargil Girl) चित्रपटातून मांडण्यात आली आहे... एअर फोर्समधील पहिली महिला पायलट म्हणून गुंजन सक्सेना ओळखली जाते. पण ही ओळख मिळवण्यापर्यंतचा तिचा प्रवास सोपा नव्हता. तिचा हाच प्रवास गुंजन सक्सेना या चित्रपटात पाहायला मिळेल.

एका स्त्रीच्या स्वप्नपूर्तीचा लढा

चित्रपटाच्या कथेविषयी बोलायचं झालं तर, लखनऊच्या एका लष्कराच्या कुटुंबातील मुलगी आहे. लहानपणापासूनच तिचं पायलट बनण्याचं स्वप्न असतं. पण तिला हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी फक्त तिच्या वडिलांचा पाठिंबा असतो. पण काही कारणास्तव ती पायलटचं शिक्षण नाही घेऊ शकत. पण तेव्हा ती एअर फोर्ससाठी अर्ज करते. 

तिथं देखील तिची निवड होण्यामध्ये अनेक समस्या उद्भवतात. पण त्यावर पण ती मात करत अखेर एअर फोर्समध्ये रुजू होते. पण तिकडे ती एकटी महिला पायलट असते. त्यामुळे स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पण जेव्हा गुंजन कारगिल युद्धात जबरदस्त कामगिरी करत स्वत:ला सिद्ध करते तेव्हा तो क्षण बघण्यासारखा असतो.


समाजाचा आरसा

चित्रपटात गुंजनचा भाऊ म्हणजेच अंगद बेदी याची विचारसरणी म्हणजे समाजाला दाखवलेला आरसा आहे. गुंजनला किंवा तिच्या विचारांना समजून न घेता तिनं एक महिला म्हणून कसं वागलं पाहिजे हे तिचा भाऊ आठवण करून देत असतो. महिला फक्त चुल-मूल यासाठी बनलेल्या आहेत याच विचारसारणीला हा चित्रपट तडा देतो.

भावासारखीच विचारसारणी गुंजनच्या आईची दाखवण्यात आली आहे. मुलीनं शिक्षण घ्यावं, एखादी साधी नोकरी करावी आणि वय झालं की लग्न करावं अशी तिच्या आईची इच्छा असते. पण गुंजनची एकच इच्छा असते ती म्हणजे पायलट बनणं.  

वडील - मुलीचं नातं

भाऊ आणि आई तिच्या निर्णयाच्या विरोधात असतात. घरातील केवळ एकमेव पाठिंवा तिला असतो तो म्हणजे वडिलांचा म्हणजे पंकज श्रीपाठीचा. त्यामुळे या बायोपकमध्ये वडिल आणि मुलीचं प्रेमळ नातं दिसून येतं. एका सिनमध्ये गुंजनला एअर फोर्सची परीक्षा पास करण्यासाठी वजन कमी करायचं असतं. त्यावेळी तिचे वडिल तिला कशाप्रकारे प्रेरणा देतात आणि परीक्षेच्या आधी तिचं वजन कमी करून घेतात. जेव्हा गुंजन हताश होते आणि मी लग्न करते असं बोलते तेव्हा ते तिला प्रेमानं समजवतात.


अभिनय

पंकज श्रीपाठी यांचा अभिनय नेहमीप्रमाणे उत्तमच आहे. अंगद बेदीची चित्रपटात छोटी भूमिका आहे. पण दमदार पणे मांडण्यात आली आहे. तर जान्हवी कपूरचा अभिनय अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. अभिनयावर तिला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. विशेष करून चेहऱ्यावरील हावभाव. कुठल्याही परिस्थितीमध्ये तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव सारखेच असतात.


दिग्दर्शन

शरण शर्मा यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या या चित्रपटात छोट्या छोट्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे मांडल्या आहेत. लडकियों को काबू रखना चाहिए, लडकिया कभी पायलेट नही बनती, तो घर संभालती है, अरे यहा से मुड जा वरना मॅडम को भी सल्युट करना पडेगा असे डायलॉग यातून समाजाची काळी बाजू योग्यप्रकारे मांडण्यात आली आहे. चित्रपट जबरदस्ती तांणण्यात आला नाही. त्यामुळे प्रेक्षकांना बांधून ठेवतो.

स्टार : ३



हेही वाचा

गुंजन सक्सेनाः द कारगिल गर्ल' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात

...म्हणून संजय दत्त अभिनीत 'सडक 2' चित्रपटाला विश्व हिंदू परिषदेचा विरोध

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा