Advertisement

कूपर रुग्णालयात बेडवरून रुग्ण पडण्याच्या घटनांमध्ये वाढ

महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांच्या संचालक व कूपर रुग्णालयाच्या कार्यवाह डीन डॉ. नीलम आंद्राडे यांनी आवश्यक असल्यास बेडला साइड रेल्स बसवण्याचे आश्वासन दिले.

कूपर रुग्णालयात बेडवरून रुग्ण पडण्याच्या घटनांमध्ये वाढ
SHARES

विलेपार्ले पश्चिम (vile parle) येथील कूपर रुग्णालयात बेडवरून पुन्हा एकदा रुग्ण पडल्याची (falling from bed) घटना घडली आहे. यामुळे रुग्णांच्या सुरक्षेविषयी प्रश्न उपस्थित झाले आहेत.

उच्च रक्तदाब आणि फिट्सच्या उपचारासाठी भरती असलेल्या 75 वर्षीय महिलेचा सोमवारी रात्री बेडवरून पडून अपघात (accident) झाला. घटनेच्या वेळी त्या आपल्या मुलीसह महिला वॉर्डमध्ये होत्या.

दरम्यान, महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांच्या संचालक आणि कूपर रुग्णालयाच्या (cooper hospital) कार्यवाह डीन डॉ. नीलम आंद्राडे यांनी आवश्यक असल्यास बेडला साइड रेल्स बसवण्याचे आश्वासन दिले.

गेल्या काही दिवसातील ही तिसरी घटना आहे. 24 नोव्हेंबरला 80 वर्षीय सोनाबाई चव्हाण या हृदयविकाराच्या उपचारासाठी भरती असताना बेडवरून पडल्याने त्यांचा मृत्यू (death) झाला होता.

झीनतबी रसूल अहमद शेख या 30 नोव्हेंबरला रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यांच्या कुटुंबीयांच्या मते, त्यांची दृष्टी जवळपास धुसर झाली होती. एका डोळ्याचे नुकतेच ऑपरेशन झाले होते आणि दुसऱ्या डोळ्याची दृष्टी अत्यल्प होती.

त्यांचे जावई मोहम्मद जावेद सिद्दीकी यांनी सांगितले की त्यांचे दोन महिला नातेवाईक आलटून-पालटून त्यांची काळजी घेत होत्या.

सोमवारी त्या थंडी वाजत असल्याचे सांगून पंखा बंद करण्यास म्हणाल्या. उपस्थित नातेवाईक पंखा बंद करण्यास गेले असता तेव्हाच त्या खाली पडल्या, असे सिद्दीकी यांनी सांगितले.

त्यांच्या डोक्याला मार बसला असून तो गंभीर स्वरुपाचा नाही. सुदैवाने त्यांना कोणतीही मोठी दुखापत झाली नाही.

रुग्णालयातील निष्काळजीपणाच्या तक्रारी नव्या नाहीत. आरोग्य कार्यकर्ते तुषार भोसले यांनी सांगितले की गेल्या तीन महिन्यांत जूहू पोलीस ठाण्यात 26 मेडिको-लीगल प्रकरणे नोंदवली गेली आहेत. 

जुलै ते सप्टेंबर 2025 दरम्यानच 26 रुग्ण पडण्याच्या घटना ‌आणि उंदिर चावण्याच्या सहा घटना नोंदल्या गेल्या होत्या. त्यानंतर पालिका प्रशासनाने काही दुरुस्तीची पावले उचलली होती.

या घटनांच्या पार्श्वभूमीवर, नातेवाईकांकडून बेडला साइड रेल्स (side rells) बसवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.



हेही वाचा

लग्नाचे वय नसतानाही लग्नाची घाई, तरुणाचे टोकाचे पाऊल

Uber ची बाईक टॅक्सी सेवा बेकायदेशीर!

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा