लग्नाचे वय नसतानाही लग्नाची घाई, तरुणाचे टोकाचे पाऊल

तरुणाला पसंत असलेल्या मुलीशी लग्न करण्याची त्याची तीव्र इच्छा होती. परंतु घरच्यांनी त्याला 21 वर्षांचा होईपर्यंत थांबायला सांगितले होते.

लग्नाचे वय नसतानाही लग्नाची घाई, तरुणाचे टोकाचे पाऊल
SHARES

एका 19 वर्षीय तरुणाने (youth) महाराष्ट्रातील (maharshtra) डोंबिवली (dombivli) येथे राहत्या घरी गळफास लावून आपल्या आयुष्याचा शेवट केला.

त्याला पसंत असलेल्या मुलीशी लग्न करण्याची त्याची इच्छा होती. परंतु घरच्यांनी त्याला 21 वर्षांचा होईपर्यंत थांबायला सांगितले होते. 

कायद्यानुसार मुलांसाठी लग्नाचे वय 21 वर्षे असल्याने, तो 21 वर्षांचा होईपर्यंत थांबण्याचा पालकांकडून त्याला सल्ला देण्यात आला होता. पण त्याला लग्न करायची घाई होती. या मानसिक तणावामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. ही घटना 30 नोव्हेंबर रोजी डोंबिवली परिसरात घडली आहे. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

मानपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरूणाचं कुटुंब मूळचे झारखंडचं आहे. ते ठाणे (thane) जिल्ह्यातील डोंबिवलीमध्ये वास्तव्यास आहेत. 

तरुणाचे त्याच्या मूळ गावातील एका मुलीवर प्रेम होते आणि तिच्याशी लग्न करण्याची त्याची इच्छा होती. मात्र, त्याच्या कुटुंबियांनी त्याला लग्नासाठी कायदेशीररित्या मान्य 21 वय होईपर्यंत वाट पाहण्यास सांगितले होते.

अखेर मानसिक तणावातून 30 नोव्हेंबर रोजी त्याने घरातच स्कार्फच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या (suicide) केली.

घटनेनंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला जवळच्या रुग्णालयात नेले होते, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे आणि घटनेचा तपास सुरू केला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.



हेही वाचा

स्थानिक संस्थांच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात हिंसाचार

Uber ची बाईक टॅक्सी सेवा बेकायदेशीर!

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा