Advertisement

ठाणे महापालिकेच्या मतदार यादीत चुका असल्याचे आरोप

उद्धव ठाकरे गटाच्या एका शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली आणि या गैरप्रकाराचे पुरावे सादर केले.

ठाणे महापालिकेच्या मतदार यादीत चुका असल्याचे आरोप
SHARES

ठाणे (thane) महानगरपालिका (thane municipal corporation) निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती (errors) आहे, असा आरोप शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि माजी खासदार राजन विचारे (rajan vichare) यांनी केला आहे.

या यादींमध्ये 10,653 डुप्लिकेट मतदार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दोन प्रभागांमध्ये 6,649 डुप्लिकेट मतदार आणि फक्त नाव किंवा आडनाव असलेल्या 3,485 मतदारांच्या नोंदी असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

इतक्या गंभीर त्रुटी असूनही जिल्हा निवडणूक आयोग आणि महापालिका निवडणूक अधिकारी "गप्प" का होते असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

प्रारूप याद्या 20 नोव्हेंबर रोजी प्रकाशित करण्यात आल्या आणि 27 नोव्हेंबर रोजी हरकतींसाठी अंतिम मुदत देण्यात आली होती.

तथापि, महापालिका प्रशासनाने उमेदवारांना प्रती देण्यास विलंब केल्याने निवडणूक आयोगाने (election commission) ही अंतिम मुदत 3 डिसेंबरपर्यंत वाढवली.

राजन विचारे म्हणाले की, पक्षाचे कार्यकर्ते प्रभागनिहाय याद्या गोळा करण्यासाठी गेले तेव्हा त्या याद्या बंडल बुकमध्ये संकलित केल्या गेल्या. यामुळे डेटा वेगळा करणे आणि पडताळणी करणे कठीण झाले.

वापरण्यायोग्य याद्या तयार करण्यात दोन ते तीन दिवस लागले त्यानंतर असंख्य त्रुटी समोर आल्या. उद्धव ठाकरे गटाच्या एका शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली आणि या गैरप्रकाराचे पुरावे सादर केले.

राजन विचारे यांनी निवडणूक आयोगावर "सरकारचे प्यादे" असा आरोप केला. तसेच त्यांनी असा दावा केला की, अधिकारी फील्ड पडताळणी न करता कार्यालयांमधूनच याद्या तयार करत आहेत.

तसेच सत्ताधारी पक्षाला फायदा व्हावा म्हणून नावे मनमानीपणे जोडली गेली असल्याचा त्यांनी आरोप केला.

  • 3,485 नोंदींमध्ये EPIC क्रमांक असूनही फक्त मतदाराचे नाव किंवा आडनाव आहे.
  • 1,575 मतदारांकडे वैध EPIC ओळखपत्रे आहेत परंतु ते मतदार यादीत (voters list) दिसत नाहीत.
  • 10,653 मतदार अनेक वॉर्डमध्ये सूचीबद्ध आहेत परंतु प्रभागनिहाय यादीत योग्यरित्या दर्शविलेले नाहीत.
  • दोन वेगवेगळ्या वॉर्डमध्ये 6,649 मतदार समान नावे असलेले आढळून आले.
  • वेगवेगळ्या वॉर्डमध्ये आणि अगदी वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात डुप्लिकेट EPIC क्रमांक असलेले मतदार आढळले. पडताळणीनंतर, अशी 8,609 नावे अंतिम यादीत पुन्हा दिसल्याचे आढळले.
  • 1,081 मतदारांच्या एका नमुना यादीत, 676 मतदारांची ओळख पटली त्यातील 21 जणांचे मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आणि 384 नावे इतर प्रभागांमधून हलवण्यात आली असे दिसून आले.
  • 562 मतदारांची यादी 100 वर्षांपेक्षा जास्त वयाची आहे; काही तरुण दिसतात परंतु त्यांची नोंद 104 वयवर्षे अशी आहे.



हेही वाचा

कूपर रुग्णालयात बेडवरून रुग्ण पडण्याच्या घटनांमध्ये वाढ

स्थानिक संस्थांच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात हिंसाचार

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा