Advertisement

बॉलिवूडमधील दुजाभाव पुन्हा समोर, कुनाल खेमू, विद्युत जामवाल संतप्त

DisneyHotstar या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या सात चित्रपटांसाठी घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेनं नेपोटिझनच्या मुद्द्यावर आगीत तेल ओतण्याचं काम केलं आहे.

बॉलिवूडमधील दुजाभाव पुन्हा समोर, कुनाल खेमू, विद्युत जामवाल संतप्त
SHARES
Advertisement

अभिनेता सुशांत सिंह राजपूच्या (sushant singh rajput) आत्महत्येनंतर बॉलीवूड नेपोटिझमचा मुद्दा चर्चेत आला. अनेकांनी बॉलिवूडच्या नेपोटिझमवर नाराजी व्यक्त केली. पण DisneyHotstar या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या सात चित्रपटांसाठी घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेनं आगीत तेल ओतण्याचं काम केलं आहे.

DisneyHotstar या ओटीटी प्लॅटफॉर्मवर एकूण सात चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये अक्षय कुमारचा 'लक्ष्मी बॉम्ब', आलिया भट्टचा 'सडक -2', अजय देवगणचा 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया', अभिषेक बच्चनचा 'द बिग बुल', सुशांत सिंहचा 'दिल बेचारा', कुणाल खेमूचा 'लूटकेस' आणि विद्युत जामवालचा 'खुदा हाफिज' या चित्रपटांचा समावेश आहे. या चित्रपटांची घोषणा करताना ऑनलाइन पत्रकार परिषद घेण्यात आली.

पत्रकार परिषदेत ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांचे सर्व कलाकार हजर होते. ज्यामध्ये अक्षय कुमार, आलिया भट्ट, अजय देवगण, अभिषेक बच्चन यांचा समावेश होता. मात्र कुणाल खेमू (kunal khemu) आणि विद्युत जामवाल (vidyut jammwal) हे हजर नव्हते. पण त्यांनी केलेल्या ट्विटवरून कळतंय की, त्यांना यासंदर्भात माहितीच नव्हती.

दोन्ही कलाकारांनी ट्विटरवर आपला राग व्यक्त केला. विद्युत जामवाल म्हणाला की, "ही मोठी घोषणा नक्कीच आहे. सात चित्रपट रिलीज होत आहेत. मात्र फक्त ५ फिल्म्स प्रमोशनच्या लायक असल्याचं समजंय. २ चित्रपटांचा यात उल्लेखही नाही. हा खूप मोठा रस्ता आहे आणि हे चक्र असंच सुरू राहणार आहे"

कुणाल खेमूनंही याबाबत ट्विटरवर नाराजी व्यक्त केली आहे. "इज्जत आणि प्रेम मागून कमवली जात नाही. कुणी ती देत नसेल तर आम्ही छोटे नाही होत. फक्त खेळण्यासाठी मैदान सारखंच द्या. आम्ही देखील मोठी उडी मारू शकतो", असं कुणालनं म्हटलं आहे.

दोघांच्या ट्विटरवरून तरी त्यांना यासंदर्भात काहीच सांगितलं नसल्याचं दिसून येत आहे.  हेही वाचा

लॉकडाऊनमध्ये 'हा' अभिनेता झाला बेरोजगार, आता विकतोय भाजी

संबंधित विषय
Advertisement