बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम करणारा अभिनेता जावेद हैदरवर लॉकडाऊननं खूप वाईट वेळ आणली आहे. काम नसल्यामुळे जावेदवर भाजी विक्री करायची वेळ आली आहे.
डॉली बिंद्रानं जेव्हा आपल्या ट्विटर हँडलवर त्याचा व्हिडिओ शेअर केला जावेदची हलाखीची परिस्थिती उघडकीस आली. टिकटॉकवर बनवलेल्या या व्हिडिओमध्ये जावेद काम करताना, 'दुनिया में रहना है तो काम कर प्यारे' या गाण्यावर लिप सिंक करताना भाजी विकताना दिसत आहे.
डॉली बिंद्रानं जावेदचा व्हिडिओ शेअर करुन लिहिलं की, ‘हा अभिनेता आहे. तो भाजी विकत आहे. त्याचं नाव जावेद हैदर आहे. १९ मार्चपासून बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीत शूटिंग बंद झाल्यामुळे जावेद हैदरदेखील याच परिस्थितीतून जातोय.
He is an actor aaj woh sabzi bech raha hain javed hyder pic.twitter.com/4Hk0ICr7Md
— Dolly Bindra (@DollyBindra) June 24, 2020
लॉकडाऊनच्या काळात अनेक कलाकारांवर काम नसल्यानं वाईट वेळ आली आहे. यापूर्वी राजेश करीर यांनीही एक भावनिक व्हिडिओ शेअर करुन मदतीची विनंती केली होती. व्हिडिओ व्हायरल होताच राजेशला आर्थिक मदत मिळाली होती.
महाराष्ट्र सरकार आणि चित्रपटाच्या संघटनांनी शूटिंग संबंधित मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यानंतर हळूहळू चित्रीकरणआला सुरुवात होत आहे.
जावेदनं बाल कलाकार म्हणून 'बाप नंबरी बेटा दस नंबरी' या चित्रपटात कादर खान यांच्या मुलाची भूमिका साकारली होती. याशिवाय तो आमिर खानच्या 'गुलाम' या चित्रपटात झळकला होता. बाबर आणि चांदनी बार या चित्रपटांमध्येही त्यानं काम केलं आहे. टीव्हीवरील 'जीनी और जू जू' आणि 'लाइफ की ऐसी की तैसी' या मालिकांमध्येही तो दिसला होता.
हेही वाचा