Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,44,063
Recovered:
47,67,053
Deaths:
80,512
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
36,674
1,447
Maharashtra
4,94,032
34,848

सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित

'या' दिवशी ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर या चित्रपटाचा प्रीमियर होणार आहे.

सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित
SHARES

१४ जून रोजी या जगाचा कायमच निरोप घेणाऱ्या सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट दिल बेचाराची रिलीज डेट समोर आली आहे. येत्या २४ जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर या चित्रपटाचा प्रीमियर होणार आहे. खास गोष्ट म्हणजे डिस्ने प्लस हॉटस्टारनं सुशांतला श्रद्धांजली म्हणून हा चित्रपट सर्व सब्सक्राइबर्स आणि नॉन-सब्सक्राइबर्ससाठी मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा करत डिस्ने प्लस हॉटस्टारने लिहिलं आहे की, "प्रेम, आशा आणि अंतहीन आठवणींची कहाणी. दिवंगत सुशांत सिंह राजपूतच्या आठवणी... प्रत्येकाच्या हृदयात नेहमी राहतील.. 'दिल बेचारा' २४ जुलै रोजी येतोय."

कास्टिंग डायरेक्टरहून चित्रपट दिग्दर्शक झालेल्या मुकेश छाबरांचा हा पहिला चित्रपट आहे. 'रॉकस्टार' फेम संजना सांघी सुशांतसोबत या चित्रपट मेन लीडमध्ये आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा करताना लिहिलं की, "सुशांतच्या प्रेमासाठी आणि त्याच्या सिनेमावर असलेल्या प्रेमापोटी हा चित्रपट सर्व ग्राहक आणि विना-ग्राहकांना उपलब्ध होईल."

मुकेश छाबरा यांनी मार्च २०१८ मध्ये या चित्रपटाची घोषणा केली होती. हा चित्रपट २०१२ मध्ये आलेल्या जॉन ग्रीकच्या 'द फॉल्ट इन अवर स्टार्स' या कादंबरीवर आधारित आहे. हा चित्रपट २९ नोव्हेंबर, २०१९ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार होता. परंतु काही कारणास्तव, त्याची रिलीज डेट ८ मे २०२० ही निश्चित करण्यात आली. दरम्यान, कोरोनाव्हायरसचा उद्रेक झाल्यामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला आणि थिएटर बंद पडले. त्यामुळे चित्रपट मोठ्या स्क्रीनपर्यंत पोहोचू शकला नाही.हेही वाचा

मनसेचा दणका, टी-सीरिजने काढलं आतिफ अस्लमचं गाणं

सुशांतचं 'हे' अर्धवट स्वप्न होणार पूर्ण, टीम घेणार जबाबदारी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा