Advertisement

सुशांतच्या बायोपिकचं पोस्टरही आलं

सुशांतचा जीवनपट चित्रपट रुपात पाहायला मिळेल. सुशांतवर आधारीत बॉलिवूडमध्ये दोन चित्रपट येऊ शकतात.

सुशांतच्या बायोपिकचं पोस्टरही आलं
SHARES

मुंबईमधील वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. तो केवळ ३४ वर्षांचा होता. पण त्यानंतर त्यानं बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून आणि नैराश्यामुळे आत्महत्या केल्याची सध्या सर्वत्र होत आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर दुःखी असलेल्या प्रत्येक देशवासियाला त्यानं इतके टोकाचे पाऊल का उचलले? हे जाणून घ्यायचे आहे. मुंबई पोलीस सुशांतच्या आत्महत्येचा तपास करत आहेत.

दरम्यान लवकरच आपल्याला सुशांतचा जीवनपट चित्रपट रुपात पाहायला मिळेल. नुकतेच बॉलीवूडचा स्वयंघोषित सिनेसमीक्षक अभिनेता कमाल आर. खान त्याच्या आयुष्यावर एक चित्रपट बनवणार आहे. या चित्रपटाद्वारे तो सुशांतला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या लोकांना एक्सपोज करणार असल्याचं ट्विटच्या माध्यमातून सांगितलं आहे.

तर नव्यानं मिळालेल्या माहितीनुसार, निर्माते विजय शेखर गुप्ता देखील सुशांतचा जीवनपट रुपेरी पडद्यावर बनवणार आहेत. ‘सुसाईड और मर्डर ए स्टार व्हॉज लॉस्ट’ (Suicide or Murder? A Star Was Lost) असं या चित्रपटाचं नाव असणार आहे. नुकतेच त्यांनी या चित्रपटाचं एक पोस्टरदेखील रिलीज केलं आहे.

विजय गुप्ता यांनी या चित्रपटाबाबत माहिती देताना सांगितलं की, सिनेसृष्टीतील बॉलिवूडच्या मोठ्या स्टार्सची असलेली कंपूशाही नष्ट करण्यासाठी हा आपण हा चित्रपट बनवू इच्छित आहोत. आपण याद्वारे बॉलिवूडला पूर्णपणे एक्सपोज करणार आहे.

बाहेरुन अनेक प्रतिभासंपन्न मुले कामाच्या शोधात सिनेसृष्टीत पाऊल ठेवतात. पण यात खूप कमी लोकांना यश मिळते. कारण इथं बॉलिवूडमधील काही मोजक्या मंडळींचं राज्य आहे. हा चित्रपट सुशांत सिंह राजपूतचा बायोपिक नसून सुशांतच्या जीवनप्रवासानं प्रेरित झालेला असेल. यामुळे सिनेसृष्टीचं खरं रुप लोकांसमोर येईल. प्रत्येकाला बॉलिवूडमध्ये काम करण्याचा हक्क आहे.



हेही वाचा

सुशांतचं 'हे' अर्धवट स्वप्न होणार पूर्ण, टीम घेणार जबाबदारी

सुशांत सिंह आत्महत्या : करण जोहर, सलमान खानसह ८ जणांविरोधात तक्रार दाखल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा