Advertisement

सुशांतसोबतचे करार सादर करा, बड्या निर्मात्यांना पोलिसांचा झटका

घराणेशाहीच्या आरोपावरून पोलिसांनी आता सुशांतसोबत करण्यात आलेले करार सादर करण्यास बड्या निर्मात्यांना सांगितले आहे. त्याच बरोबर गुरूवारी पोलिसांनी सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्तीचा ही जबाब नोंदवला आहे.

सुशांतसोबतचे करार सादर करा, बड्या निर्मात्यांना पोलिसांचा झटका
SHARES

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये मोठी उलथा पालथ सुरू झाली आहे. घराणेशाहीच्या आरोपावरून पोलिसांनी आता सुशांतसोबत करण्यात आलेले करार सादर करण्यास बड्या निर्मात्यांना सांगितले आहे. त्याच बरोबर गुरूवारी पोलिसांनी सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्तीचा ही जबाब नोंदवला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १२ जणांचे जबाब नोंदवलेले आहेत.

हेही वाचाः- पॉझिटिव्ह रिपोर्ट रुग्णांना सांगू नका, पालिकेच्या नियमावर मनसे नाराज

मागील अनेक दिवसांपासून मानसिक तणावखाली असलेल्या सुशांत सिंग राजपूतने रविवारी सकाळी त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतने उचललेल्या या टोकाच्या पाऊलाने अनेकांना धक्का बसला. नुसत्या बाँलीवूडमधील नाही तर राजकीय नेते, खेळाडू सर्वांनीच सुशांतला सोशल मिडियावरून श्रद्धांजली वाहिली. मात्र त्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप ही पुढे आलेले नाही. सुशांतच्या आत्महत्येनंतर वांद्रे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत ६ जणांची चौकशी केली होती.त्याच प्रामुख्याने रिया चक्रवर्ती, सुशांतचे दोन मॅनेजर, सुशांतचा जवळचा मित्र अभिनेता महेश सेट्टी, एक नोकर आणि चावीवाल यांचा समावेश होता. आत्महत्येनंतर काही तासातच पोलिसांनी सुशांतने उचललेल्या आत्महत्येच्या पाऊलाबाबत चौकशी केली होती. मात्र त्यावेळी ती बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. दरम्यान गुरूवारी सकाळी रिया स्वतः चौकशीसाठी पोलिस ठाण्यात हजर झाली होती.

हेही वाचाः- नाराजी नव्हतीच, फक्त समानता हवी, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर काँग्रेसचं घुमजाव

सुशांत आणि रियामध्ये मैत्रीचे संबध होते. त्यामुळे सुशांत का नैराक्षेत होता. अशा कोणत्या अडचणी होत्या, त्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे. याबाबत रियाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच पोलिसांनी रियाला चौकशीसाठी बोलावले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रिया सोबतच सुशांत ज्या डाँक्टरांकडे नैराक्षेत उपचार घेत होता. त्यांची देखील पोलिस चौकशी करणार आहेत. तसेच सुशांतला दैनदिन डायरी लिहायची सवय असल्याचे कळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरातून काही डायऱ्या ही हस्तगत केल्याचे कळते. ज्यातून सुशांतच्या आत्महत्ये मागील कारण समजण्यास पोलिसांना मदत होऊ शकते. तसेच पोलिसांनी त्याचा जवळचा मित्र मुकेश छाब्रा याची ही बुधवारी पोलिसांनी चौकशी केली आहे. मुकेशनेच सुशांतला त्याच्या करिअरमध्ये पहिल्यांदा रोल दिला होता. दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. या आत्महत्येला व्यावसायिक स्पर्धा, गटबाजी आणि वशिलेबाजी कारणीभूत असल्याचा आरोप होत होता.

त्यानुसार पोलिसांनी बॉलीवूडमधील एका बड्या कंपनीसोबत अभिनेता सुशांतसिंगचे कॉन्ट्रॅक्ट होते. त्या कंपनीला आता पोलिसांनी या कॉन्ट्रॅक्टची प्रत सादर करण्यास सांगितली आहे. या  कॉन्ट्रॅक्टवरून पोलिसांना तपासाची दिशा आणि सुशांतच्या आत्महत्येमागे खरचं घराणेशाही आहे का हे कळण्यास ही मदत होईल.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा