Advertisement

बॉलिवूडमधील घराणेशाही विरोधात ऑनलाईन मोहीम

बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या विरोधात फेसबूक यूजरनं ऑनलाइन याचिका दाखल केली आहे.

बॉलिवूडमधील घराणेशाही विरोधात ऑनलाईन मोहीम
SHARES

बॉलिवूडमधील मोठ्या मीडिया हाऊसेसनी सुशांतला बॅन केल्याची चर्चा आहे. करण जोहर, सलमान खान, यशराज फिल्म्स या मोठ्या प्रॉडक्शन हाऊसेसची नाव यात समोर येत आहे. आता बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या विरोधात जयश्री शर्मा श्रीकांत नावाच्या एका फेसबूक यूजरनं ऑनलाइन याचिका दाखल केली आहे. त्यासाठी तिनं सह्यांची मोहिम राबवली आहे.


ऑनलाईन याचिकेला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. जयश्री शर्मा श्रीकांत यांनी १६ जून रोजी सायंकाळी ६.४७ वाजता Change.org वर ही मोहिम सुरू करण्यात आली. "कृपया सही करा आणि शेअर कला. आपण फिल्म इंडस्ट्रीत बदल घडवून आणू शकतो आणि असं काहीतरी पुन्हा पुन्हा होण्यापासून रोखू शकतो." अशी पोस्ट त्यांनी फेसबुकवर शेअर केली आहे. जयश्री यांनी १० लाख सह्यांचे लक्ष्य समोर ठेऊन ही मोहीम सुरु केली होती. ३० तासांत ८.५० लाखांहून अधिक लोकांनी त्यावर सही केली आहे.

दरम्यान करण जोहर, सलमान खान, एकता कपूर, संजय लिला भन्साळी यांच्यासह ८ जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वकील सुधीर कुमार ओझा यांनी बिहारमधील मुझफरपूर येथील पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या सर्वांवर सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं १४ जून रोजी आत्महत्या केली. त्याच्या अकाली निधनामुळे सगळ्यांनाचा प्रचंड मोठा धक्का बसला. त्याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या सहा महिन्यांत त्याच्या हातून सात चित्रपट गेल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो नैराश्येत होता. त्यातूनच त्यानं आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल उचललं असावं, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.



हेही वाचा

सुशांत सिंह आत्महत्या : करण जोहर, सलमान खानसह ८ जणांविरोधात तक्रार दाखल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा