सुशांत सिंग राजपूत प्रकरणात लेखक रुमी जाफरीची पोलिसांनी केली चौकशी

तपासासंदर्भात पोलिसांनी आतापर्यंत तीन डझनहून अधिक लोकांचे जबाब नोंदविली आहेत.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात लेखक रुमी जाफरीची पोलिसांनी केली चौकशी
SHARES

सुशांत सिंग राजपूतचा 'दिल बेचारा' नुकताच रिलीज झाला. सुशांत सिंगने आत्महत्या करून आता पंधरा ते वीस दिवस ओलांडले मात्र त्याच्या आत्महत्येमागील गूढ अद्यापही गुलदस्त्यात आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ३५हून अधिक जणांची चौकशी केली असली, तरी पोलिसांच्या हाथी अद्याप ठोकस असं काही लागलेलं नाही. दरम्यान सुशांतच्या आत्महत्ये प्रकरणी पोलिसांनी गुरूवारी लेखक व दिग्दर्शक रूमी जाफरीला बोलावले होते.

हेही वाचाः- जिम, माॅल सुरू करणार पण.., राजेश टोपेंनी केला खुलासा

सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येपासून मुंबई पोलिस त्याच्या आत्महत्या करण्या मागचे कारण तपासण्यात गुंतले आहेत. या तपासासंदर्भात पोलिसांनी आतापर्यंत तीन डझनहून अधिक लोकांचे जबाब नोंदविली आहेत. यामध्ये रिया चक्रवर्ती, चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी, मूल्य दिग्दर्शक मुकेश छाबरा, आदित्य चोपडा, डॉ. केर्सी चवडा, राजीव मसंद आणि सुशांत यांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे. त्यात आता पोलिसांनी लेखक आणि दिग्दर्शक रुमी जाफरी यांना समन्स बजावले आहे. रुमी जाफरी सुशांतच्या जवळच्या मित्रांपैकी एक आहे. तो रिया चक्रवर्ती आणि सुशांतला घेऊन एक चित्रपट बनवणार असल्याचे सांगितले जात होते.

हेही वाचाः- व्हॅक्सीन बनवण्याची जबाबदारी सोनू सूदला द्या, चाहत्याला सोनूचं मजेशीर उत्तर

यासंदर्भात पोलिसांनी रूमीला चौकशीसाठी बोलावले असावे. त्यांच्या चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नव्हते. मात्र चित्रपटाचे कामकाज सुरू करण्यासाठी रुमी लॉकडाउन संपण्याची वाट पहात होते. या चित्रपटाचे शूटिंग मे महिन्यात होणार होते. परंतु त्यानंतर लॉकडाउन झाल्यामुळे या प्रकल्पाची तारीख पुढे केली गेली. या चित्रपटाचे सुरूवातीला गाणी शूट केली जाणार होती. तशी कल्पना सुशांतला दिली होती. सुशांतचे पात्र लक्षात ठेवूनच ही कथा लिहिण्यात आली होती. मात्र तो मध्येच आमची साथ सोडून गेला. त्यामुळे पुढे या चित्रपट बनवण्यावरची माझी इच्छा संपलेली असल्याची माहिती रुमीने एका प्रसार माध्यमांला दिली
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा