Advertisement

"हो मी ड्रग्ज घ्यायचे", कंगनाचा 'हा' व्हिडिओ व्हायरल

या व्हिडिओवरून तिच्यावर टीका होऊ लागली आहे. पण हा व्हिडिओ कधीचा आहे किंवा या व्हिडिओत किती सत्यता आहे? हे सांगणं कठिण आहे.

"हो मी ड्रग्ज घ्यायचे", कंगनाचा 'हा' व्हिडिओ व्हायरल
SHARES

अभिनेत्री कंगना रणौतचा (kangana ranaut) एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये तिनं स्वत: आपण ड्रग्ज घेत असल्याचं कबुल केलं होतं. या व्हिडिओवरून तिच्यावर टीका होऊ लागली आहे. पण हा व्हिडिओ कधीचा आहे किंवा या व्हिडिओत किती सत्यता आहे? हे सांगणं कठिण आहे.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक झाल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतचीही ड्रग्जसंबंधी चौकशी केली जाणार अशी बातमी समोर आली.

कंगनावरील ड्रग्जबाबतच्या आरोपांबाबत मुंबई पोलीस सखोल तपास करतील असं निवेदन आपण विधानसभेत सादर केलं, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

त्यानंतर कंगनाने ट्वीट केलं की, "माझी ड्रग्ज टेस्ट करा. माझे सर्व कॉल रेकॉर्ड तपासा. तुम्हाला कोणत्याही ड्रग्ज डिलरशी माझे संबंध सापडले किंवा मी माझ्या चुकीची कबुली दिली तर मी कायमची मुंबई सोडून जाईन".

कंगनाच्या या ट्वीटनंतर तिचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. ज्यात कंगना म्हणते, "मी घरातून पळून गेले होते. एक-दीड वर्षात मी एक फिल्म स्टार होते. मी ड्रग्ज अॅडिक्ट होते. माझ्या आयुष्यात खूप कांड झाले. किशोरवयातच माझ्या आयुष्यात खूप भयानक घडलं होतं. विचार करा मी किती खतरनाक आहे"

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी ड्रग्ज अँगलचा तपास करणाऱ्या नार्कोटिक्स विभागानं (NCB) रिया चक्रवर्तीला (rhea chakraborty), रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युएल मिरांडा यांना अटक केलेली आहे.

रियानं प्रथमच ड्रग्ज घेत असल्याची कबुली दिली. इतकचं नाही तर रियानं एनसीबीला ड्रग्स घेतल्या जाणाऱ्या बॉलिवूड पार्ट्यांबाबत माहिती दिली. आता NCB ड्रग्स प्रकरणात सुशांतचे सहकलाकार आणि अभिनेत्यांसह २५ बॉलिवूड कलाकारांना समन्स पाठवणार आहे.

कंगना देखील काही कलाकारांची नावं घेतली होती आणि त्यांनी ड्रग्ज तपासणी करून घ्यावी असं म्हटलं होतं. "रणवीर सिंह, रणबीर कपूर, अयान मुखर्जी, विकी कौशल यांना विनंती करते की त्यांनी ड्रग तपासणीसाठी त्यांच्या रक्ताचा नमुना द्या, असे चर्चेत आहे की ते कोकेनच्या आहारी गेले आहेत. त्यांनी या अफवा खोट्या ठरवाव्यात असे मला वाटते. या तरुणांचे सँपल्स क्लीन निघाले तर ते लाखाेंची प्रेरणा ठरतील."



हेही वाचा

तर मुंबई कायमची सोडेन… कंगनाचं गृहमंत्र्यांना आव्हान

तेलगु अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचं निधन

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा