Advertisement

तेलगु अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचं निधन

ते आंध्र प्रदेशच्या गुंटूरमध्ये होते. रेड्डी हे ७४ वर्षांचे होते. जय प्रकाश यांना सहाय्यक भूमिका आणि कॉमेडी रोलसाठी ते प्रसिद्ध होते.

तेलगु अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचं निधन
SHARES

प्रसिद्ध तेलुगू अभिनेता जयप्रकाश रेड्डी यांचं मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते आंध्र प्रदेशच्या गुंटूरमध्ये होते. रेड्डी हे ७४ वर्षांचे होते. जय प्रकाश यांना सहाय्यक भूमिका आणि कॉमेडी रोलसाठी ते प्रसिद्ध होते.

लॉकडाऊनपासून ते घरीच होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जयप्रकाश रेड्डी यांना बाथरुममध्ये हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले.

जय प्रकाश रेड्डी शिक्षक होते आणि त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. अभिनयाची आवड जोपासण्यासाठी ते गुंटूरमध्ये स्टेज प्ले करायचे.  जयप्रकाश यांनी आपल्या करिअरची सुरुवात 'ब्रह्मापुत्रुदू' मधून केली होती. 

यासोबतच त्यांनी प्रेमिचुकुंदम रा, गब्बर सिंह, चेन्नाकेशवारेड्डी, सीथाया आणि टेंपरसारख्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका निभावल्या होत्या. जयप्रकाश रेड्डी अल्लागड्डा जिल्ह्यातील राहणारे होते आणि चित्रपटांमध्ये आपल्या रायलसीमा या खास लहेज्यात बोलण्यामुळे प्रसिद्ध होते.

तेलुगू देशम पार्टीचे प्रमुख एन चंद्रबाबू नायडू यांनीही रेड्डी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं की, 'जयप्रकाश रेड्डी यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या निधनानं तेलुगू सिनेमा आणि थिएटरनं एक रत्न गमावला आहे. अनेक दशकांपासून त्यांनी केलेल्या भूमिकांनी आपल्याला अनेक आठवणी दिल्या आहेत. या दुःखद प्रसंगी मी त्यांचे कुटुंब आणि मित्रांसोबत आहे. मला या घटनेनं खूप दुःख झालं आहे.'

तामिळ आणि तेलुगू सिनेमातून बॉलिवूडमध्ये आलेल्या रकुल प्रीत सिंहनं ट्विटरवर लिहिलं की, “ही फार वाईट घटना आहे. मी त्यांच्याबरोबर बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले. कुटूंबाला माझी सहानुभूती. जय प्रकाश रेड्डी गुरुंच्या आत्म्याला शांती लाभो."

अभिनेता महेश बाबूने लिहिले, "जय प्रकाश रेड्डी यांच्या निधनाबद्दल ऐकून मी स्तब्ध झालोय. ते एक कमालीचे अभिनेते होते. त्यांच्या अनुभवाची शिदोरी कायम जपून ठेवणार. त्यांच्या कुटूंबियांबद्दल आणि प्रियजनांबद्दल मनापासून संवेदना."

प्रकाश राज यांनी लिहलं की, "ते एक असे अभिनेता होते, ज्यांनी रुपेरी पडद्यावर आणि रंगमंचावर आपल्या अभिनयानं प्रत्येक पात्रात जीव ओतला. त्यांच्या कुटुंबाविषयी माझी सहानुभूती आहे. आमचे मनोरंजन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चीफ."



हेही वाचा

अर्जुन कपूरनंतर मलायका अरोराची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कंगनाच्या कार्यालयाची पाहणी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा