Advertisement

पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कंगनाच्या कार्यालयाची पाहणी

यासंदर्भात कंगनानं ट्विटरवर माहिती दिली. यासोबतच तिनं पालिका अधिकाऱ्यांवर आरोप देखील केले आहेत.

पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कंगनाच्या कार्यालयाची पाहणी
SHARES

मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कंगना रणौतच्या पाली हिल परिसरातील कार्यालयाची पाहणी केली. मुंबई महापालिकेच्या नियमानुसार हे कार्यालय बांधलेलं आहे का? याचा आढावा यावेळी मनपा कर्मचाऱ्यांनी घेतला. यासंदर्भात कंगनानं ट्विटरवर माहिती दिली. यासोबतच तिनं पालिका अधिकाऱ्यांवर आरोप देखील केले आहेत.

पाहणीसाठी गेलेल्या पथकात तीन अधिकारी आणि तीन कर्मचारी सहभागी होते. त्यांनी या संपूर्ण कार्यालयाची पाहणी केली. कंगनाच्या कार्यालयाला लागून असलेल्या इतर बंगल्यांचीही पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. एकूणच या मार्गावर बांधकाम रस्त्यावर आलं आहे का? इतर गोष्टी बेकायदेशीर आहेत का? बांधकामाबाबत काही त्रुटी आहेत का? याचा आढावा पालिकेच्या पथकानं घेतला.

काही ठिकाणी त्यांनी रस्त्याची मापंही घेतली आहेत. यावेळी कंगनाच्या कार्यालयाच्या रंगरंगोटीचं काम सध्या सुरु आहे. हे काम करणाऱ्या पाच कामगारांचीही पालिकेच्या पथकानं किरकोळ चौकशी केली. त्यानंतर पालिकेचं पथक तिथून निघून गेलं.

यासंदर्भात माहिती देताना कंगनानं पालिका अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत. कंगना म्हणाली की, माझ्या घरात ते जबरदस्ती घुसले आणि सर्व पाहणी करू लागले. त्यांनी माझ्या शेजारच्यांना देखील त्रास दिला. याशिवाय त्यांची भाषा अशी होती की, वोह जो मॅडम है उसकी करतूत का परिणाम सबको भरना होगा. मी आधीच सांगते की ते उद्या माझी जागा पाडतील.

कंगनानं आपल्या ट्विटसोबत एक व्हिडिओ देखील जाहीर केला आहे. तसंच मी कुठल्याही प्रकारचं अनधिकृत बांधकाम केलं नसल्याचं देखील तिनं स्पष्ट केलं आहे.

"माझ्याकडे सर्व कागदपत्रं आहेत, पालिकेच्या परवानग्या आहेत. माझ्या मालमत्तेत काहीही बेकायदा झालेलं नाही. बेकायदेशीर बांधकामांना नोटीस देऊन दर्शवण्यासाठी स्ट्रक्चर योजना पाठवावी." असंही कंगना बोलली.  

गेल्या अनेक दिवसांपासून कंगना रणौत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्र पोलीस दलावर ट्विटरमार्फत टीका करत आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत कंगनानं पंगा घेतल्यानं पालिकेनं ही पाहणी केली नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, कंगनानं मुंबई पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर, शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनाला मुंबईत भीती वाटत असेल तर तिनं मुंबईत येऊ नये, असं म्हटलं होतं.

कंगनानं ती ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार आहे, कोणात हिंम्मत असेल तर अडवून दाखवा, असा इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी कंगनाला 'वाय' सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. वाय सुरक्षा दिल्याबद्दल कंगनानं अमित शहा यांचे आभार मानले आहेत.



हेही वाचा

मुंबईला रक्ताची चटक लागली, आंदोलनानंतर कंगना बिथरली

मुंबईत येते, कोणाच्या बापाची हिम्मत असेल तर रोखून दाखवा - कंगना

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा