Advertisement

मुंबईत येते, कोणाच्या बापाची हिम्मत असेल तर रोखून दाखवा - कंगना

मुंबईची पाक व्याप्त काश्मीरसोबत केलेली तुलना यामुळे सोशल मीडियावर आणि विविध स्तरामध्ये कंगनावर अनेकांनी नाराजीचा सूर दाखवला.

मुंबईत येते, कोणाच्या बापाची हिम्मत असेल तर रोखून दाखवा - कंगना
SHARES

बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रणौत हिनं देशाची आर्थिक राजधानी मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरसोबत (POK) केली आहे. कंगनाच्या या वक्तव्यामुळे तिच्यावर चहुबाजुंनी टीकेची झोड उठली आहे. बॉलिवूडसह मराठी कलाकारही कंगणावर चांगलेच संतापले आहेत. आता त्यानंतर कंगनानं पुन्हा एकदा ओपन चॅलेंज करत ट्वीट केलं आहे.

'मी मुंबईत येऊ नये अशी मला बरेच लोक धमकी देत आहेत. म्हणूनच मी येत्या आठवड्यात मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई विमानतळावर उतरण्याआधी मी मुंबईत येण्याची तारीखही कळवेन. कुणाच्या बापाची हिम्मत असेल तर रोखून दाखवा.' असं कंगनानं धमकी देणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

कंगनानं पुढे स्माईल अपलोड करत म्हटलं आहे की, ९ सप्टेंबर रोजी मी मुंबईत येईन. मुंबईत विमानतळावर उतरण्याआधी वेळ सांगेन. सोशल मीडियावरून धमक्या देणाऱ्यांपैकी कुणामध्ये हिंम्मत असेल तर रोखून दाखवा असं खुल आव्हान कंगनानं दिलं आहे.

मुंबईची पाक व्याप्त काश्मीरसोबत केलेली तुलना यामुळे सोशल मीडियावर आणि विविध स्तरामध्ये कंगनावर अनेकांनी नाराजीचा सूर दाखवला. 'कृतज्ञता दाखवता येत नसेल तर कृतघ्न तरी होऊ नका. #ILoveMumbai', अशा शब्दांत काही कलाकालांनी कंगनाला सुनावलं आहे.



हे्ही वाचा

एनसीबीची शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडाच्या घरी छापेमारी

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या दुसऱ्या भावाचंही निधन

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा