Advertisement

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या दुसऱ्या भावाचंही निधन

च्यावर उपचार करणारे डॉ. जलील पारकर यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या दुसऱ्या भावाचंही निधन
SHARES

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या दुस-या भावाचंही कोरोनामुळे निधन झालं आहे. ९० वर्षीय अहसान खान यांनी बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारात लीलावती रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. जलील पारकर यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

दिलीप कुमार यांच्या दोन्ही भावांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यामुळे त्यांना आर्टिफिशिअल ब्रिदिंग सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. १५ ऑगस्ट रोजी दोघांचंही कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर २१ ऑगस्ट रोजी असलम खान यांचं निधन झालं होतं. ते 88 वर्षांचे होते.

गेल्या महिन्यात एका न्यूज वेबसाईटशी बोलताना दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी सांगितलं होतं की, अहसान खान आणि असलम खान त्यांची बहीण फरीदा (ज्या पूर्वी अमेरिकेत राहत होत्या) सोबत राहत होते. दिलीप कुमार यांच्या प्रकृतीबाबत विचारणा करणारे फोन कॉल्स आल्यानंतर सायरा बानो यांनी हा खुलासा केला होता.

सायरा म्हणाल्या होत्या, "मी हे यासाठी सांगत आहे, कारण जेव्हापासून अहसान भाई आणि असलम भाई यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले तेव्हापासून लोक दिलीप साहेबांच्या प्रकृतीबद्दल विचारणा करत आहेत. अनेकांना वाटते की, अहसान भाई आणि असलम भाई आमच्याबरोबर राहत होते. पण ते आमच्यासोबत राहात नव्हते. कोरोनाची साथ पसरल्यापासून आम्ही गेल्या पाच महिन्यांपासून आम्ही घराबाहेर पडलेलो नाहीत.''



हेही वाचा

सुबोध भावेनंतर हे मराठी कलाकार कोरोनाच्या विळख्यात, शोचं चित्रिकरण थांबवलं

अभिनेता सुबोध भावेसह पत्नी आणि मुलगा कोरोना पॉझिटिव्ह

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा