Advertisement

सुबोध भावेनंतर हे मराठी कलाकार कोरोनाच्या विळख्यात, शोचं चित्रिकरण थांबवलं

नुकतंच अभिनेता सुबोध भावेनं त्याला आणि त्याची पत्नी, मुलगा यांना कोरोना झाल्याचं जाहीर केलं. आता या कलाकारांना कोरोना झाल्यानं शोचं चित्रिकरण थांबवलं आहे.

सुबोध भावेनंतर हे मराठी कलाकार कोरोनाच्या विळख्यात, शोचं चित्रिकरण थांबवलं
SHARES

सोनी मराठी वाहिनीवर नुकत्याच सुरू झालेल्या ‘सिंगिंग स्टार- गाणे ताऱ्यांचे, गाणे साऱ्यांचे’ या मालिकेचे चित्रिकरण पुढील दहा दिवसांसाठी थांबवण्यात आलं आहे. याचं कारण म्हणजे या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी झालेला अभिनेता अभिजीत केळकर आणि अभिनेत्री पौर्णिमा डे यांच्यासह सेटवरील सहा जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

अभिजीत आणि पौर्णिमा यांच्या व्यतिरिक्त गायिका जुईली जोगळेकर आणि दोघा क्रू मेम्बर्सना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर येत आहे. तर या शोमधील मेंटॉर आणि गायक रोहित राऊत यालादेखील कोरोना संसर्ग झाला होता. मात्र आता तो कोरोनामुक्त झाला आहे.

‘सिंगिंग स्टार’ शो मध्ये अभिजीत केळकर आणि पौर्णिमा डे हे स्पर्धक आहेत. तर गायक रोहित राऊत हा अभिनेत्री स्वानंदी टिकेकरचा मेंटॉर आहे. तर जुईली जोगळेकर ही अभिनेता अंशुमन विचारेची मेंटॉर आहे. एकुण सहा जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानं सिंगिंग स्टार शोचे शूटिंग पुढील दहा दिवसांसाठी थांबवण्यात आलं आहे.

अभिजीत केळकरनं सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं सांगितलं आहे. “नमस्कार, सर्व प्रकारची काळजी घेऊनही मला कोरोनाची लागण झाली. माझी फक्त पाठ दुखत होती. या व्यतिरिक्त मला आणखी काहीही होत नव्हतं किंवा सर्दी, खोकला, ताप अशी कुठलीही लक्षणही नव्हती. डॉक्टरांना विचारल्यावर त्यांनी टेस्ट करून घ्यायला सांगितली, जी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी व्यवस्थित ट्रीटमेंट घेत आहे आणि आता माझी तब्येत उत्तम आहे. माझी बायको तृप्ती आणि राधा- मल्हार सगळे ठणठणीत आहेत. तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच कायम पाठीशी असू देत” अशी पोस्ट अभिजीतने इंस्टाग्रामवर केली आहे.

नुकतंच अभिनेता सुबोध भावेनं त्याला आणि त्याची पत्नी, मुलगा यांना कोरोना झाल्याचं जाहीर केलं. सध्या हे तिघं घरातच उपचार घेत आहेत. चाचणी पॉझिटिव्ह आली तरी प्रकृती ठिक असल्याचं सुबोध भावेनं सोशल मिडियावर स्पष्ट केलं.



हेही वाचा

'आपला मराठी बिग बॉस' तिसरा सिजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेता सुबोध भावेसह पत्नी आणि मुलगा कोरोना पॉझिटिव्ह

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा