Advertisement

'आपला मराठी बिग बॉस' तिसरा सिजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी बिग बॉसच्या तिस-या पर्वाची घोषणा देखील करण्यात आली आहे.

'आपला मराठी बिग बॉस' तिसरा सिजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
SHARES

भांडण, द्वेष, प्रेम आणि स्पर्धा या सगळ्यांचं मिश्रण असलेला रिअ‍ॅलिटी शो म्हणजे बिग बॉस. अभिनेता सलमान खानने नुकताच 'बिग बॉस' या रिअ‍ॅलिटी शोच्या १४ व्या सीझनचा प्रमोशनल व्हिडिओ प्रसिद्ध केला. आता दुसरीकडे मराठी बिग बॉसच्या तिस-या पर्वाची घोषणा देखील करण्यात आली आहे.

मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वाचा टीझर कलर्स मराठी वाहिनीनं रिलीज केला आहे. पहिल्या दोन पर्वांच्या यशानंतर आता तिस-या पर्वाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तिस-या पर्वात कोण कोण स्पर्धक म्हणून सहभागी होणार हे अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आलं आहे.

बिग बॉसच्या पहिल्या पर्वात अभिनेत्री मेघा धाडे विजयी झाली. यानंतर दुस-या पर्वात अमरावतीच्या शिव ठाकरेनं बाजी मारली होती. तर दोन्ही पर्वात प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर यांनी सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली होती. दोन्ही पर्वातील त्यांचे सूत्रसंचालन प्रेक्षकांसह स्पर्धकांना आवडले होते. त्यामुळे तिस-या पर्वातही त्यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व कधी सुरु होणार याची तारीख अद्याप जाहीर केली नाही. मात्र सप्टेंबरअखेर किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला हे पर्व सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बिग बॉसच्या घरात जवळपास १५ स्पर्धक एकत्र राहतात. त्यामुळे सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धक आणि निर्मात्यांना अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग अशा नियमांचं पालन करून शो कसा चालवला जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.



हेही वाचा

अभिनेता सुबोध भावेसह पत्नी आणि मुलगा कोरोना पॉझिटिव्ह

'ब्लॅक पँथर' चित्रपटातील अभिनेता चाडविक बॉसमन याचं निधन

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा