Advertisement

'ब्लॅक पँथर' चित्रपटातील अभिनेता चाडविक बॉसमन याचं निधन

मार्वल स्टुडिओ फिल्म ब्लॅक पँथर या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेला चाडविक ४३ वर्षांचा होता.

'ब्लॅक पँथर' चित्रपटातील अभिनेता चाडविक बॉसमन याचं निधन
SHARES

हॉलिवूड स्टार (Hollywood star) चाडविक बॉसमन (chadwick boseman died) याचं शुक्रवारी निधन झालं. मार्वल स्टुडिओ फिल्म ब्लॅक पँथर या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेला चाडविक ४३ वर्षांचा होता. गेल्या 4 वर्षांपासून तो कर्करोगानं (Colon Cancer) ग्रस्त होता.

चाडविकच्या निकटवर्तीयांनी अभिनेत्याच्या मृत्यूची पुष्टी केली. लॉस एंजेलिस इथं चाडविकचं घरी निधन झालं.


कोलन कॅन्सरनं ग्रस्त

चाडविकच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवटच्या क्षणी चाडविकची पत्नी आणि कुटुंबीय त्याच्यासोबत होते. तो कोलन कर्करोगानं (आतड्यांचा कर्करोग) ग्रस्त होता.

चायडिवकच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबीयांकडून एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. ज्यात त्याचे वर्णन खरा योद्धा म्हणून केलं गेलं. या निवेदनात म्हटलं आहे की, "खरा योद्धा, चाडविकनं आपल्या संघर्षाद्वारे आपल्यासाठी सर्व आवडते चित्रपट आपल्यासाठी आणले.

गेल्या चार वर्षांत चडविकनं बर्‍याच चित्रपटांचं शूटिंग केलं. हे सर्व त्याच्या अनेक शस्त्रक्रिया आणि केमोथेरपी दरम्यान घडल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं. ब्लॅक पँथर या सिनेमात किंग टी 'छल्लाची व्यक्तिरेखा साकारणं त्याच्यासाठी सन्मानाची गोष्ट असल्याचं कुटुंबियांनी सांगितलं. 


ब्लॅक पँथरनं सुपरस्टार बनवलं

''४२' आणि 'Get On Up' सारखे चित्रपट चाडविकनं आपल्या कारकिर्दित केले. या चित्रपटातून स्वत:चं नाव कमावलं. त्यानंतर २०१८  च्या मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स फिल्म 'ब्लॅक पँथर' मध्ये टी-चाला / ब्लॅक पँथरची भूमिका साकारून प्रेक्षकांमध्ये हिट ठरला.

त्यानंतर तो ब्लॅक पँथरची भूमिका साकारून अ‍ॅव्हेंजर्स-इन्फिनिटी वॉर आणि अ‍ॅव्हेंजर्स-एंड गेम सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये पुन्हा दिसला. यावर्षी त्यांचा ‘Da 5 Bloods’ हा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला.

चाडविकच्या निधनावर बॉलिवूडच्या कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. 




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा