Advertisement

अबू सालेमचे व्हिडिओ पाहून महेश मांजरेकारांना खंडणीसाठी धमकी

मिलिंद तुळसकर असं या आरोपीचं नाव आहे. त्याचा अबू सालेमशी काही संबंध नसल्याचं देखील चौकशीत समोर आलं आहे.

अबू सालेमचे व्हिडिओ पाहून महेश मांजरेकारांना खंडणीसाठी धमकी
SHARES

हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील नामांकित निर्देशक, दिग्दर्शक आणि कलाकार महेश मांजरेकर यांना खंडणीसाठी अबु सालेमच्या नावानं धमकी देणाऱ्या व्यक्तीला खंडणी विरोधी पथकानं अटक केली होती. मिलिंद तुळसकर असं या आरोपीचं नाव आहे. त्याचा अबू सालेमशी काही संबंध नसल्याचं देखील चौकशीत समोर आलं आहे.

रत्नागिरी मधून मिलिंद तुळसकर याला खंडणीविरोधी पथकानं ताब्यात घेतलं. चौकशीसाठी त्याला रत्नागिरीतून मुंबईत आणण्यात आलं. चौकशी दरम्यान मिलिंद तुळसकरनं त्याचा गुन्हा मान्य केला. युट्युब वर अबू सालेमचे व्हिडिओ पाहून मिलिंद तुळसकरला हा प्लॅन सुचला. myneta.com वरून त्यानं महेश मांजरेकर यांचा नंबर शोधून त्यांना खंडणीसाठी मेसेज करण्यास सुरुवात केली. मिलिंद तुळसकरचा अबू सालेमशी काही संबंध नाही, असं तपासामध्ये स्पष्ट झालं आहे. लवकरात लवकर जास्त पैसे कमावण्यासाठी त्यानं हा गुन्हा केला असल्याचं सांगितलं.

मिलिंद तुळसकर याला 2 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी बजावण्यात आली.

२३ ऑगस्टला रात्रीच्या वेळेस महेश मांजरेकर यांच्या मोबाईल वर एक मॅसेज आला. ज्यामध्ये एका अज्ञात व्यक्तीकडून मेसेजद्वारे ३५ कोटी रुपये खंडणी मागण्यात आली. स्वतःला अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचा हस्तक सांगून खंडणी मागण्यात आली.

२३ ते २५ ऑगस्ट दरम्यान या व्यक्तीकडून वारंवार महेश मांजरेकर यांना खंडणीसाठी मॅसेज येऊ लागले. तसंच फोनद्वारे ही त्यानं संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. २४ ऑगस्टला महेश मांजरेकर यांनी दादर पोलीस स्टेशन आणि खंडणी विरोधी पथकाकडे यासंदर्भात तक्रार केली. याची गांभीर्यानं दखल घेत खंडणी विरोधी पथकानं तपास सुरू केला होता.



हेही वाचा

अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना अंडरवर्ल्डकडून धमकी

अभिनेते दिलीप कुमार यांच्या भावाचं कोरोनामुळे निधन

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा