Advertisement

अभिनेता सुबोध भावेसह पत्नी आणि मुलगा कोरोना पॉझिटिव्ह

फक्त सुबोध भावेच नाही तर त्यांची पत्नी आणि मुलगा देखील कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

अभिनेता सुबोध भावेसह पत्नी आणि मुलगा कोरोना पॉझिटिव्ह
SHARES

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे देखील कोरोनाग्रस्त असल्याचं समोर आलं आहे. अभिनेता सुबोध भावे यांनी यासंदर्भात स्वत: ट्वीट करून माहिती दिली आहे. फक्त सुबोध भावेच नाही तर त्यांची पत्नी आणि मुलगा देखील कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

सुबोध भावे यांनी ट्विटरवर यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी लिहलं की, 'मी,मंजिरी आणि माझा मोठा मुलगा कान्हा आम्हा तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आम्हा तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही घरीच स्वत:ला क्वारंटाईन करून घेतलं आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शानं उपचार सुरू आहेत. तुम्ही सगळे काळजी घ्या आणि घरी सुरक्षित रहा.

नुकतंच रितेश देशमुखची पत्नी जेनेलियानं देखील कोरोनावर मात केली आहे. तिनं इन्स्टावर यासंदर्भात खुलासा केला. मी कोरोना पॉझिटिव्ह आले होते. गेले २१ दिवस माझ्यावर उपचार सुरू होते. आता मी पूर्ण बरी झाले असून कुटुंबासोबत आहे. हा काळ माझ्यासाठी खूप कठिण होता. आजारापेक्षा एकटेपणा जास्त त्रासदायक असतो, अशा भावना जेनेलियानं व्यक्त केल्या होत्या.हेही वाचा

'ब्लॅक पँथर' चित्रपटातील अभिनेता चाडविक बॉसमन याचं निधन

अबू सालेमचे व्हिडिओ पाहून महेश मांजरेकारांना खंडणीसाठी धमकी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा