Advertisement

मुंबईला रक्ताची चटक लागली, आंदोलनानंतर कंगना बिथरली

ठाण्यात कंगनाच्या पोस्टरला काळं फासलं. तिच्या पोस्टरला जोडे मारले. यावर कंगना भडकली असून तिनं आणखी एक ट्विट केलं आहे.

मुंबईला रक्ताची चटक लागली, आंदोलनानंतर कंगना बिथरली
SHARES

अभिनेत्री कंगना रनौत हिला महाराष्ट्रात सर्व स्तरातून विरोध होतं आहे. कंगना विरुद्ध शिवसेना आणि महाराष्ट्र सरकार असं ट्विट युद्ध सुरूच आहे. कंगनाच्या मुंबई बद्दलच्या ट्वीट विरोधात शिवसेनेच्या महिला आघाडीनं ठाण्यात कंगनाच्या पोस्टरला काळं फासलं. तिच्या पोस्टरला जोडे मारले. यावर कंगना भडकली असून तिनं आणखी एक ट्विट केलं आहे.

कंगनानं ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "सुशांतला आणि साधूंना मारल्यानंतर आता प्रशासनाविरोधात माझं मत व्यक्त केलं म्हणून माझ्या पोस्टरला जोडे मारताय... मुंबईला रक्ताची चटक लागली आहे वाटतं... ",

याशिवाय कंगनानं हेही म्हटलं आहे की, "महाराष्ट्राबद्दल हे असं प्रेम दाखवणाऱ्या सगळ्या चापलुसांनी हे लक्षात घ्या की, मराठी मनाचा अभिमान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांना मोठ्या पडद्यावर दाखवणारी हिंदी चित्रपटांच्या इतिहासातली मी पहिली अभिनेत्री दिग्दर्शक आहे. आणि याच लोकांनी या चित्रपटांना प्रदर्शित होण्याआधी विरोध केला होता."

त्यानंतर केलेल्या आणखी एका ट्विटमध्ये तिनं म्हटलं आहे की, महाराष्ट्र कोणाच्या बापाचा नाही. महाराष्ट्र त्यांचाच आहे ज्यांनी मराठी गौरवाला प्रतिष्ठा मिळवून दिली. मी थणकावून सांगते की मी मराठा आहे. उखाडा माझं काय उखाडायचं आहे ते.

दरम्यान कंगना रणौत हिच्या मुंबई बद्दलच्या ट्वीट विरोधात शिवसेनेच्या महिला आघडीनं ठाण्यात कंगणाच्या पोस्टरला काळं फासलं. तिच्या पोस्टरला जोडे मारले. कंगनाला मुंबईत पाय ठेऊ देणार नाही, असा इशारा देखीव यावेळी महिला शिवसैनिकांनी दिला.

ठाण्यात आनंद दिघे यांच्या शक्ती स्थळाजवळ हे आंदोलन करण्यात आलं. महिला शिवसैनिकांनी या वेळेस कंगनाच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली. कंगना रणौत हिनं केलेलं वक्तव्य हे निषेधार्य आहे. ती जर असंच बालिश वक्तव्य करत असेल तर तिच्या सर्व चित्रपटांवर आम्ही बहिष्कार टाकू. ती ९ सप्टेंबरला मुंबईत येत असेल तर तिचं शिवसेना स्टाईलमध्ये शिवसेना महिला स्वागत करतील, असा इशारा माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी दिला आहे.



हेही वाचा

शिवसेना भडकली, ठाण्यात महिला शिवसैनिकांनी जाळला कंगनाचा पोस्टर

“आमच्या रणरागिणी 'तिचं' थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत”

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा