Advertisement

शिवसेना भडकली, ठाण्यात महिला शिवसैनिकांनी जाळला कंगनाचा पोस्टर

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील कंगनाचा समाचार घेतला आहे. यात आता महिला शिवसैनिक आक्रमक झाल्या आहेत.

शिवसेना भडकली, ठाण्यात महिला शिवसैनिकांनी जाळला कंगनाचा पोस्टर
SHARES

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिच्या वक्तव्यावरून चांगलाच गदारोळ माजला आहे. कलाकारांसोबतच राजकीय पक्ष देखील कंगनाच्या वक्तव्याचा विरोध करत आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील कंगनाचा समाचार घेतला आहे. यात आता महिला शिवसैनिक आक्रमक झाल्या आहेत.

कंगना राणावत हिच्या मुंबई बद्दलच्या ट्वीट विरोधात शिवसेनेच्या महिला आघडीनं ठाण्यात कंगणाच्या पोस्टरला काळं फासलं. तिच्या पोस्टरला जोडे मारले. कंगनाला मुंबईत पाय ठेऊ देणार नाही, असा इशारा देखीव यावेळी महिला शिवसैनिकांनी दिला.

ठाण्यात आनंद दिघे यांच्या शक्ती स्थळाजवळ हे आंदोलन करण्यात आलं. महिला शिवसैनिकांनी या वेळेस कंगनाच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली. "कंगना रणौत हिनं केलेलं वक्तव्य हे निषेधार्य आहे. ती जर असंच बालिश वक्तव्य करत असेल तर तिच्या सर्व चित्रपटांवर आम्ही बहिष्कार टाकू. ती ९ सप्टेंबरला मुंबईत येत असेल तर तिचं शिवसेना स्टाईलमध्ये शिवसेना महिला स्वागत करतील," असा इशारा माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी दिला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील कंगनाचं नाव न घेता तिला फटकारलं आहे. संजय राऊत म्हणाले, मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे...ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा.. शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही. Promise.

कंगनानं देखील पुन्हा एकदा ओपन चॅलेंज करत ट्वीट केलं आहे. 'मी मुंबईत येऊ नये अशी मला बरेच लोक धमकी देत आहेत. म्हणूनच मी येत्या आठवड्यात मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई विमानतळावर उतरण्याआधी मी मुंबईत येण्याची तारीखही कळवेन. कुणाच्या बापाची हिम्मत असेल तर रोखून दाखवा.' अशी धमकी कंगनानं दिली आहे.हेही वाचा

मुंबईत येते, कोणाच्या बापाची हिम्मत असेल तर रोखून दाखवा - कंगना

मुंबई मराठी माणसाच्या बापाचीच, राऊतांनी सुनावलं

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा