Advertisement

मुंबई मराठी माणसाच्या बापाचीच, राऊतांनी कंगनाला ठणकावलं...

कंगना रणौतनं आणखी एक ट्विट करत सगळ्यांनाच चॅलेंज दिलं. पण शिवसेना नेते संजय राऊत यांनी मात्र पुन्हा एकदा तिला फटकारलं आहे.

मुंबई मराठी माणसाच्या बापाचीच, राऊतांनी कंगनाला ठणकावलं...
SHARES

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनं मुंबईची तुलना POK सोबत केल्यावर सर्व स्तरातून तिच्यावर टीका होत आहे. कला क्षेत्रातून ते राजकीय वर्तुळापर्यंत तिच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेण्यात आला. या वक्तव्यावरून टीका होत असातानाच कंगना रणौतनं आणखी एक ट्विट करत सगळ्यांनाच चॅलेंज दिलं. पण शिवसेना नेते संजय राऊत यांनी मात्र पुन्हा एकदा तिला फटकारलं आहे.

कंगनानं ओपन चॅलेंज देत ट्विट केलं की, मी मुंबईत ९ तारखेला येत आहे. कोणाच्या बापाची हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा. संजय राऊत यांनी देखील कंगनाला यावर चांगलंच उत्त दिलं आहे.

कंगनानं सुशांत प्रकरणावरून मुंबई पोलिसांवर वक्तव्य केलं होतं. त्यावरून देखील संजय राऊत यांनी कंगनाला नाव न घेता सुनावलं होतं.

राऊत म्हणाले होते की, माझं नाव घेऊन कुणाला पब्लिसिटी स्टंट करायचा असेल तर खुशाल करा. पण मुंबई तुम्हाला पोसते. सर्व काही देते. त्या मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल कोणीही उठून काहीही बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही शिवसैनिक आहोत. पोकळ धमक्या देत नाही. थेट कृती करतो.

याशिवाय, कंगनाकडे कुठले पुरावे असतील, तर तिने केवळ सोशल मीडियावर व्यक्त न होता पोलिसांना पुरावे द्यावेत. तसंच कंगनाला मुंबईत इतकंच असुरक्षित वाटत असेल, तर तिने मुंबईत परत येऊ नये, असंही राऊत यांनी सुचवलं होतं.



हेही वाचा

मुंबईत येते, कोणाच्या बापाची हिम्मत असेल तर रोखून दाखवा - कंगना

“आमच्या रणरागिणी 'तिचं' थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत”

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा