Advertisement

अर्जुन कपूरनंतर मलायका अरोराची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

रविवारी अभिनेता अर्जुन कपूरनं त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं सांगितले होते. त्यानंतर सोमवारी मलायकानं तिचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं आहे.

अर्जुन कपूरनंतर मलायका अरोराची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
SHARES

अभिनेत्री मलायका अरोरा हिला देखील कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी सोशल मीडिया पोस्टरच्या माध्यमातून तिनं ही माहिती दिली. यापूर्वी म्हणजे रविवारी अभिनेता अर्जुन कपूरनं त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं सांगितले होते. त्यानंतर सोमवारी मलायकानं तिचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं आहे.

हेल्थ अपडेट देताना मलायकानं सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं की, 'आज माझा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. परंतु मी ठिक आहे, हे मला तुम्हा सर्वांना सांगायचे आहे. मला कोणतीही लक्षणे नाहीत. आणि मी सर्व आवश्यक प्रोटोकॉलचे अनुसरण करत आहे. डॉक्टर आणि अधिकार्‍यांच्या सूचनेनुसार मी घरातच क्वारंटाइन आहे. मी तुम्हा सर्वांना शांत आणि सुरक्षित राहण्याची विनंती करते.

आपल्या सर्व सहकार्याबद्दल धन्यवाद.

खूप प्रेम,

मलायका अरोरा.

मलायकानं ही पोस्ट शेअर केल्यानंतर बिपाशा बसु, काजल अग्रवाल, सुझान खान, नीना गुप्ता, विद्या माळवदेसह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत लवकरात लवकर बरे होण्यासाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता अर्जुन कपूरला देखील कोरोनाची लागण झाली आहे. इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहित स्वतः अर्जुननं रविवारी याबद्दलची माहिती दिली. अर्जुनला कोणतीच लक्षणं नसून सध्या त्याला घरीच क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

आपल्या आगामी चित्रपटाची शूटिंग तो अभिनेत्री नीना गुप्ता आणि रकुल प्रीत सिंह यांच्यासोबत फिल्म सिटीमध्ये करत होता. अर्जुनला कोरोनाची लागण होताच या चित्रपटाची शूटिंग थांबवण्यात आली आहे. अर्जुननं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, ''मला कोरोनाची लागण झाली असून ही माहिती तुम्हा सर्वांना देणं हे माझं कर्तव्य आहे. मला कोणतीच लक्षणे नसून मी ठीक आहे. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मी घरीच स्वत:ला क्वारंटाइन करून घेतलं असून पुढील काही दिवस क्वारंटाइनमध्येच राहणार आहे.'



हेही वाचा

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा