Advertisement

...म्हणून दीपिका, श्रद्धा आणि साराच्या जाहिराती थांबवण्याचा निर्णय

सध्या या सर्व कलाकारांची नावं काही आरोपांमुळे डागाळली आहेत. त्यामुळे यांच्या जाहिराती चालवायच्या की नाही? यावर अनेक मोठे ब्रॅंड विचार करू लागले आहेत.

...म्हणून दीपिका, श्रद्धा आणि साराच्या जाहिराती थांबवण्याचा निर्णय
SHARES

एनसीबीनं अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी आणि तस्करीप्रकरणी अनेकांची चौकशी सुरू केली आणि बॉलिवूडमध्ये कार्यरत असलेल्या बड्या नावांची नावं यात येऊ लागली. श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि दीपिका पादुकोण अशा बड्या कलाकारांचा यात समावेश आहे. या नावांमुळे आता बड्या आंतरराष्ट्रीय ब्रॅंड्सची गोची झाली आहे.

सध्या या सर्व कलाकारांची नावं काही आरोपांमुळे डागाळली आहेत. त्यामुळे यांच्या जाहिराती चालवायच्या की नाही? यावर अनेक मोठे ब्रॅंड विचार करू लागले आहेत. 

२०१९च्या हवाल्यानुसार एकट्या दीपिकावर तब्बल १९  मोठे ब्रॅंड अवलंबून आहेत. यात ब्रिटानिया, तनिष्क, एक्सिस बॅंक, ओप्पो, विस्तारा एअरलाईन्स आदी ब्रॅंडसचा समावेश होतो. आता या सर्वच ब्रॅंडसची गोची झाली आहे. दीपिकावर या ब्रॅंडस मिळून सध्या ६०० कोटी रुपये लागले आहेत.

श्रद्धा कपूर ही यूथ आयकॉन म्हणून ओळखली जाते. ती वीट, लिप्टन, लॅक्मे, हेअर एंड केअर, व्हॅसलीन आदी अनेक ब्रॅंड आपल्याकडे बाळगून आहे. यात जवळपास तिच्याकडे ३०० कोटीचे ब्रॅंडस असल्याचं कळतं. तर सारा अली खानही अलिकडे आली असली तरी तिच्याकडे चांगले ब्रॅंड्स आहेत. कारण, सारा अली खान ही सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी असल्यामुळे तिच्याकडे असलेलं वलय पाहता प्रॉमिसिंग चेहरा म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. साराकडेही अनेक चांगले ब्रॅंडस आहेत. यात शीतपेयं, शुज, पेन, सौंदर्यप्रसाधने यांचा सहभाग होतो.

आता या तीन कलाकारांची नावं यात आल्यानं या ब्रॅंड्सनी आपल्या या कलाकारांच्या जाहिराती तूर्त थांबवायचा निर्णय घेतला आहे. लोकांच्या मनात या कलाकारांमध्ये सध्या रोष पाहायला मिळत आहे. त्यामुळे या जाहिराती दाखवून आणखी नुकसान न ओढवता मध्यममार्ग काढण्यावर सध्या या कंपन्या विचार करू लागल्या आहेत.



हेही वाचा

महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर

मुंबईत उभारणार जागतिक दर्जाचं मंगेशकर संगीत महाविद्यालय

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा