Advertisement

चौकशीदरम्यान दीपिकासोबत हजर राहण्याच्या रणवीरच्या विनंतीवर NCB चा खुलासा

चौकशी दरम्यान हजर राहण्यासाठी रणवीर सिंगनं NCB कडे परवानगी मागितली असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. यावर NCB म्हणाले की...

चौकशीदरम्यान दीपिकासोबत हजर राहण्याच्या रणवीरच्या विनंतीवर NCB चा खुलासा
SHARES

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करताना ड्रग्ज प्रकरण समोर आलं. अमली पदार्थ विरोधी विभाग म्हणजे NCB कडून या प्रकरणात गुंतलेल्या बॉलिवूड कलाकारांची आता चौकशी सुरु आहे. याप्रकरणी शनिवारी अभिनेत्री दीपिका पदुकोणची NCB कडून चौकशी होणार आहे.

चौकशी दरम्यान हजर राहण्यासाठी रणवीर सिंगनं NCB कडे परवानगी मागितली असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. यासदंर्भात अखेर NCB कडून खुलासा करण्यात आला आहे. ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या चौकशीच्यावेळी तिच्यासोबत उपस्थित राहण्यासाठी रणवीर सिंगनं कोणतीही लिखित किंवा शाब्दीक विनंती केलेली नाही, असं NCB नं स्पष्ट केलं आहे.

घाबरल्यामुळे दीपिकाला पॅनिक अटॅक येऊ शकतो, त्यामुळे चौकशीच्यावेळी तिच्यासोबत उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, यासाठी रणवीर सिंगनं एनसीबीला लिखित विनंती केल्याच्या अफवा पसरवल्या जात होत्या. पण रणवीर किंवा स्वत: दीपिकानं अशी कोणतीही विनंती केली नसल्याचं NCB नं स्पष्ट केलं आहे.

एनसीबीनी शुक्रवारी रकुल प्रीतसिंगची ड्रग्ज संबंधित प्रकरणात चौकशी केली. शनिवारी एनसीबीनं दीपिका व्यतिरिक्त सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांनाही बोलावलं आहे, असं बोललं जात आहे. या चौकशीत बॉलिवूड आणि राजकारणातील अनेक दिग्गजांची नावं समोर येऊ शकतात.हेही वाचा

गायक एसपी बालसुब्रमण्यम यांचं निधन

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान 'या' दोन अभिनेत्यांना कोरोनाची लागण

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा