Advertisement

रणवीर सिंगनं दीपिकासोबत चौकशीदरम्यान हजर राहण्यास मागितली परवानगी?

दीपिका पदुकोणसोबत एनसीबी कार्यालयात हजर राहण्यासाठी अभिनेता रणवीर सिंगनं परवानगी मागितली आहे.

रणवीर सिंगनं दीपिकासोबत चौकशीदरम्यान हजर राहण्यास मागितली परवानगी?
SHARES

दीपिका पदुकोणवर रणवीर सिंगचं किती प्रेम आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही. अशी अनेक जोडपी आहेत जी रणवीर सिंग आणि दीपिकाला आपले आदर्श मानतात. अलीकडेच सुशांतसिंग राजपूत मृत्यूच्या बाबतीत ड्रग्स अँगल येताच बॉलिवूडमधील अनेक बड्या सेलिब्रिटिंची नावं समोर आली आहेत.

आता या प्रकरणात दीपिका पदुकोणचं नावही समोर आलं आहे. एनसीबीनं शनिवारी दीपिका पादुकोण यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. दीपिका पदुकोणसोबत एनसीबी कार्यालयात हजर राहण्यासाठी अभिनेता रणवीर सिंगनं परवानगी मागितली आहे, अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.

दीपिका पादुकोण गुरुवारी रात्री रणवीर सिंगसोबत मुंबईत दाखल झाली. ती गोव्यात शकुन बत्राच्या चित्रपटाचं शूटिंग करत होती. या चित्रपटात तिच्यासोबत अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी देखील दिसणार आहेत.

आता रणवीर सिंगनं दीपिकाची चौकशी होणार त्यावेळी एनसीबीच्या आवारातच राहण्याची विनंती एनसीबीकडे केली असल्याचं बोललं जातंय. रणवीर सिंग म्हणाला की, दीपिका अनजायटी जारानं ग्रस्त आहे. शिवाय तिला पॅनिक अटॅक पण येतात. त्यामुळे अशा परिस्थितीत मी तिथं राहणं योग्य आहे. पण यासंदर्भात अधिकृत माहिती अजून समोर आली नाही. 

एनसीबीनी शुक्रवारी रकुल प्रीतसिंगची ड्रग्ज संबंधित प्रकरणात चौकशी केली. शनिवारी एनसीबीनं दीपिका व्यतिरिक्त सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांनाही बोलावलं आहे, असं बोललं जात आहे. या चौकशीत बॉलिवूड आणि राजकारणातील अनेक दिग्गजांची नावं समोर येऊ शकतात.हेही वाचा

गायक एसपी बालसुब्रमण्यम यांचं निधन

नवाझुद्दिनच्या अडचणीत वाढ, पत्नीकडून पोलिसात तक्रार दाखल

संबंधित विषय
Advertisement