केबीसीच्या सेटवर का भावूक झाले अमिताभ? वाचा

बॉलिवूडमध्ये महानायक अशी ओळख असलेले अभिनेते अमिताभ बच्चन यांचा 11 ऑक्टोबरला 75 वा वाढदिवस आहे. याच निमित्ताने केबीसी या शोच्या निर्मात्यांनी अमिताभ यांच्यासाठी सरप्राईज व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ पाहताच अमिताभ बच्चन भावूक झाले.

काय आहे या व्हिडिओत?

या व्हिडिओत नैनीतालमधील शेरवूड कॉलेजशी जोडलेल्या अमिताभ यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. या शोच्या निर्मात्यांनी हा व्हिडिओ केबीसीच्या सेटवर दाखवताच अमिताभ चांगलेच भावूक झाले. हा एपिसोड 11 ऑक्टोबरला रात्री 9 वाजता प्रसारित होणार आहे. खरेतर केबीसी हा अमिताभ बच्चन यांचा देखील आवडता शो आहे.


हेही वाचा - 

अमिताभ बच्चन यांचा 'स्पेशल डे'


पुढील बातमी
इतर बातम्या