अमिताभ मराठीत ट्वीट करतात तेव्हा...


SHARE

मुंबई - मराठी दिनाच्या निमित्ताने महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून मराठी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सगळ्यात विशेष बाब म्हणजे अमिताभ यांनी चक्क मराठीत ट्विट केलंय. अमिताभ यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, 'इंग्रजी 'A' फॉर 'Apple' ने सुरू होते आणि शेवटी 'Z' फॉर 'Zebra' वर येऊन संपते. शेवटी इंग्रजी जनावर बनवून सोडते. पण मराठी ही जगातील एकमात्र अशी लिपी आहे, जी व्यक्तिला 'अ' म्हणजे 'अज्ञानी'पासून शेवटी 'ज्ञ ' म्हणजेच 'ज्ञानी' बनवून टाकते'.

संबंधित विषय
ताज्या बातम्या