अमिताभ बच्चन यांचा 'स्पेशल डे'


SHARE

शुक्रवार 7 जुलै 2017 हा दिवस आपल्या सर्वांसाठी सामान्य असेल. पण बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्यासाठी मात्र हा खूपच खास आहे. नेहमी ते आपल्या ट्विटवरून चाहत्यांना काही ना काही सांगत असतात. त्याचप्रमाणे त्यांनी यावेळी 7 जुलै 2017 ही तारीख का स्पेशल आहे, यासंदर्भात ट्विट केले आहे.

<blockquote class="twitter-tweet" data-lang="en"><p lang="hi" dir="ltr">T 2478 -आज की तारीख कितनी अच्छी है 7/7/17 - साथ साथ एक साथ !!! <a href="https://t.co/Ry8Zn8TzLj">pic.twitter.com/Ry8Zn8TzLj</a></p>&mdash; Amitabh Bachchan (@SrBachchan) <a href="https://twitter.com/SrBachchan/status/883224762947837952">July 7, 2017</a></blockquote>
<script async src="//platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script>

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी 7/7/17 या तारखेला ''साथ साथ एक साथ'' असे म्हणत त्यांनी या तारखेत काय खास आहे याचे महत्त्व ट्विट करून आपल्या चाहत्यांना सांगितले आहे.

अमिताभ बच्चन यांनी यापूर्वी अनेकदा आपल्या ट्विटरवरून चाहत्यांना वेगवेगळी रंजक माहिती पुरवली आहे. अमिताभ आपल्या ट्विटरवर नेहमीच सक्रिय राहून चाहत्यांशी संवाद साधत असतात. अनेकदा त्यांनी सामाजिक मुद्द्यांवर ट्विट देखील केले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या फेसबुक अकाऊंटमधून तांत्रिक बिघाड झाल्यावरून फेसबुकला चार शब्दही सुनावले होते.
मुंबई ट्रॅफिक पोलिस देखील अमिताभ यांच्या चित्रपटातील डायलॉगचा वापर लोकांमध्ये ट्रॅफिक नियमांचे पालन करण्याबद्दल जागरुता निर्माण व्हावी यासाठी करतात.

संबंधित विषय
ताज्या बातम्या