कान्स फिल्म फेस्टिवलला आता कोरोना व्हायरसचा फटका बसला आहे. जगातील सर्वात मोठा फिल्म फेस्टिवल्सपैकी एक लोकप्रिय फेस्टिवल असलेला कान्स फिल्म फेस्टिवल पुढे ढकलण्यात आला आहे. १२ मे ते २३ मे या काळात ७३ वा कान्स फिल्म फेस्टिवल आयोजित करण्यात आला होतं. पण जगभरात कोरोनाचा फैलाव झाल्याने या फेस्टिवलची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
फेस्टिवल साजरा करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. सगळ्या संभाव्य गोष्टी तपासून पाहिल्या पण ते शक्य नाही. यामुळे हा फिल्म फेस्टिवल पुढे ढकलणं सर्वात महत्वाचं आहे. फ्रेंच आणि इतर देशातील लोकांची परिस्थिती पाहता हे पाऊल उचलणं सर्वात महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा -