Advertisement

ICICI बँक आता तुमच्या घरी

आयसीआयसीआय बँकेच्या ५०० हून अधिक सेवा या आता घरबसल्या मिळणार आहेत.

ICICI बँक आता तुमच्या घरी
SHARES

देशभराला सध्या कोरोनानं आपल्या विळख्यात घेण्यास सुरुवात केली आहे. या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन तसंच डॉक्टरांकडून वारंवार गर्दीत जाणं टाळा असा सल्ला दिला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आयसीआयसीआय बँकेच्या ५०० हून अधिक सेवा या आता घरबसल्या मिळणार आहेत. हे सर्वकाही मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकींगच्या माध्यमातून शक्य असून त्यासाठी ग्राहकांना बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नसल्याचं बँकेनं म्हटलं आहे.


बँकेनं सुरू केली 'ही' सुविधा

ICICI Stack ही सुविधा बँकेनं सुरू केली आहे. त्यानुसार घरीच ग्राहकांना बँकेच्या सोयी सुविधांचा लाभ घेता येणार आहे. या सेवांमध्ये नवीन बचत खाते आणि चालू खाते सुरू करण्याच्या सेवांचा समावेश आहे. तसं झटपट कर्ज, झटपट क्रेडिट कार्ड, गृह कर्ज, वाहन कर्जच, ओव्हर ड्राफ्ट, व्यवसायासाठीच्या कर्जासाठी तुम्ही अर्ज देखील करू शकता.


डिजिटल व्यवहारावर भर

वरील सेवांसाठी तुम्ही अर्ज केल्यानंतर बँकेचा प्रतिनिधी तुमच्या घरी येऊन तुम्हाला या सेवा देईल. तुम्हाला त्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. तसंच पैशांचा व्यवहार तुम्ही डिजिटल व्यवहारही करू शकता. त्यात UPI, भारत बिल पेमेंट यांचा वापर करू शकता. या सेवांसह विमासेवाही डिजिटल स्वरुपात उपलब्ध आहे. तसंच फ़िक्स डीपॉजिट, RD, SIP, PPF, NPS Mutual fund सारख्या गुंतवणुकीच्या सेवांचा लाभही तुम्ही घरबसल्या घेऊ शकता.



हेही वाचा

कोरोनामुळे 10 हजार कर्मचाऱ्यांना पाठवले बिनपगारी रजेवर

पुढील आठवड्यात बँका 4 दिवस बंद

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा