Advertisement

कोरोनामुळे 10 हजार कर्मचाऱ्यांना पाठवले बिनपगारी रजेवर

कोरोना व्हायरसचा फटका हॉटेल व्यवसायाला मोठा बसला आहे.

कोरोनामुळे 10 हजार कर्मचाऱ्यांना पाठवले बिनपगारी रजेवर
SHARES

 कोरोना व्हायरसचा फटका हॉटेल व्यवसायाला मोठा बसला आहे. जगातील सर्वात मोठी हॉटेल चेन असणाऱ्या मॅरियट इंटरनॅशनलने कर्मचार्‍यांना रजेवर पाठवले आहे. या सुट्ट्या बिनपगारी असणार आहेत. सुट्ट्यांचा कर्मचार्‍यांना कोणताही पगार मिळणार नाही. मॅरियटने जवळपास सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांना सुट्टीवर पाठवले आहेत. यासह कंपनीने आपली काही हॉटेल्सही बंद करण्यास सुरवात केली आहे. कंपनीने जवळपास  10 हजार कर्मचाऱ्यांना बिनपगारी रजेवर पाठवले आहे.

 कोरोना व्हायरसच्या परिणामुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था ढासळत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारे अनेक व्यवसाय  कोरोना प्रादुर्भावामुळे ठप्प आहेत. अनेक हॉटेल व्यवसायांवर देखील गदा आली आहे. त्यामुळे आणखी खर्च होऊन नुकसान वाढू नये म्हणून मॅरियटने 10 हजार कर्मचाऱ्यांना सुट्टीवर पाठवलं आहे. मॅरियटने निवेदनात म्हटलं आहे की, कोरोनामुळे त्यांचा व्यवसाय घटला आहे.  व्यवसायातील मागणीत त्याला लक्षणीय घट झाली आहे.  कोरोनाचा आमच्या व्यवसायावर झालेला परिणाम कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.कोरोनामुळे अनेक देशातील एअरलाइन व्यवसायावरही मोठा परिणाम झाला आहे. बहुतांश देशांमधील सरकारने विमान उड्डाणांवर बंदी किंवा मर्यादा घातली आहे. कोरोना व्हायरसमुळे GoAir ने मंगळवारपासून आपली आंतरराष्ट्रीय उड्डाणे स्थगित करण्याची घोषणा केली आहे. उड्डाणांची संख्या कमी झाल्यामुळे काही कालावधीनंतर  कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना पगाराच्या रजेवर पाठवेल. तसंच कंपनी कर्मचार्‍यांच्या पगारात 20 टक्के कपात करण्याचा विचार करीत आहे.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा