Advertisement

पुढील आठवड्यात बँका 4 दिवस बंद

पुढील आठवड्यात 4 दिवस बँका बंद राहणार आहेत. सरकारी बँकांनी विविध मागण्यांसाठी 27 मार्चला संप पुकारला आहे.

पुढील आठवड्यात बँका 4 दिवस बंद
SHARES

पुढील आठवड्यात 4 दिवस बँका बंद राहणार आहेत. सरकारी बँकांनी विविध मागण्यांसाठी 27 मार्चला संप पुकारला आहे. त्यामुळे ग्राहकांना बँकांची कामे मंगळवारपर्यंत पूर्ण करणं आवश्यक आहे.  सरकारी बँकांच्या मेगा विलिनीकरणाला विरोध, पगारवाढ आणि आठवड्यातून 2 दिवस सुट्टी या मागण्यांसाठी हा संप करण्यात येणार आहे.

 संप झाला तर या महिन्याच्या शेवटी 4 दिवस बँका बंद राहतील. 25 मार्चला गुढीपाडवा असल्यामुळे  बँका बंद आहेत. 27 मार्चला संप, 28 मार्च चौथा शनिवार तर 29 मार्च रोजी रविवारची सुट्टी असल्यामुळे 4 दिवस बँकांचं कामकाज होणार नाही. 27 मार्च रोजी जर संप पुकारण्यात आला, तर 2020 मधील हा तिसरा संप असेल. याआधी 8 जानेवारीला भारत बंद दरम्यान बँक कर्मचारी संघटनांनी मोदी सरकारच्या योजनांविरुद्ध एकदिवसीय संप केला होता. त्यानंतर 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी रोजीही बँक कर्मचारी संघटनांकडून संप करण्यात आला होता. 

10 सरकारी बँकांचे प्रस्तावित विलीनीकरण थांबवणे, आयडीबीआय बँकेचे खाजगीकरण, बँकिंग सुधारणांचे रोलबॅक, बुडीत कर्जाची वसुली आणि ठेवींवरील व्याज दरात वाढ आदी मागण्या बँक कर्मचारी संघटनांनी केल्या आहेत. 


 
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा