‘बिग बॉस’मध्ये पहायला मिळणार पूल व्हाॅलीबाॅल

  • मुंबई लाइव्ह टीम & संजय घावरे
  • मनोरंजन

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग बॉस’ मराठीच्या घरामध्ये गुरूवारी देखील ‘घरोघरी मातीच्या चुली’ हे कार्य पार पडलं. सासू-सासऱ्यांना त्यांच्या जावई-सुनांना सतवायचं होतं. मात्र, काल टीम्समध्ये अदलाबदल करण्यात आली. टीम सून-जावयाचं नेतृत्व भाग्यश्री, तर टीम सासू–सासऱ्यांचं नेतृत्व अतिशा नाईक यांनी केलं. ज्यामध्ये शर्मिष्ठा आणि सईमध्ये, तर मेघा आणि पुष्करमध्ये बरेच वाद झाले.

उत्तम कार्यासाठी हिरे

रेशमने स्मिताला दिलेली सगळी कामं उत्तमरीत्या पार पाडली. ‘घरोघरी मातीच्या चुली’ हे कार्य उत्तमरीत्या पार पाडलं त्यांना हिरे देण्यात आले. मेघा, सई आणि पुष्कर यांचं त्रिकुट प्रेक्षकांना चांगलंच आवडत होतं, पण गेल्या आठवड्यापासून त्यांच्यामध्ये बरेच वाद होत आहेत. हे वाद गुरूवारीदेखील दिसून आले. सईला मेघाचं म्हणणं पटत नाही, तर पुष्करला मेघाचं म्हणणं ऐकून घ्यायचं नाही.

पुष्कर, मेघा, सईतील वाद

शुक्रवारीदेखील हा वाद विकोपाला जाणार असून पुष्कर, मेघा, सई, आस्ताद आणि रेशम यांच्यामध्ये बरेच वाद होणार आहेत. या वादामध्ये नक्की कोण माघार घेईल? घराचा नवा कॅप्टन कोण होईल? हे बघायला मिळेल. घरामध्ये आता बरेच वाद विवाद होत आहेत. ज्यामध्ये पुष्कर, मेघा आणि सई यांच्यातील वाद चर्चेचा विषय बनला आहे. मेघाने  सईशी आणि शर्मिष्ठाशी बोलताना हे देखील स्पष्ट केलं की, आता पुष्कर आणि तिच्यातील मैत्री परत पहिल्यासारखी होऊ शकत नाही.

कॅप्टनसीसाठी वाद

शुक्रवारी कॅप्टनसीच्या उमेदवारीसाठी मेघा, शर्मिष्ठा, स्मिता आणि नंदकिशोरमध्ये वाद होणार आहेत. नंदकिशोर यांचं म्हणणं अाहे की, मेघा आणि शर्मिष्ठा दिलेला टास्क नीट खेळल्या नाहीत. मेघाला आस्ताद, रेशम, पुष्कर, सई यांच्या रागाला सामोरं जावं लागणार आहे. मेघाने जे काही पुष्करसोबत केलं ते चुकीचं आणि माणुसकीला सोडून होतं असं त्यांचं म्हणणं आहे.

नवा कॅप्टन कोण ?

घरामध्ये शुक्रवारी कॅप्टनसीच्या निवडीचं कार्य पार पडणार आहे. महेश मांजरेकर यांनी दर आठवड्याला या घरामध्ये स्पर्धेबरोबरच खेळाडूवृत्ती देखील तितकीच महत्वाची असल्याचं नेहेमीच नमूद केलं आहे. म्हणून या आठवड्याचं कॅप्टनसीचे कार्य मांजरेकर यांनी आखून दिलं आहे.हटके पद्धतीने पूल व्हाॅलीबाॅल खेळण्यात येणार आहे. या कार्यानिमित्त घरातील सदस्यांची चार टीम्समध्ये विभागणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता बिग बॉसच्या घराचा नवा कॅप्टन कोण बनणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.


हेही वाचा -

मेघडंबरीतील 'सेल्फी' भोवली, रितेशला मागावी लागली माफी

...तर मराठी सिनेमातही अभिनय करेन - अक्षय कुमार


पुढील बातमी
इतर बातम्या