Advertisement

मेघडंबरीतील 'सेल्फी' भोवली, रितेशला मागावी लागली माफी

महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रागयडावरील मेघडंबरीत बसून फोटो काढल्यानं रितेशसह दिग्दर्शक रवी जाधव, लेखक विश्वास पाटील यांना शिवप्रेमींच्या रोषाला सामोरं जावं लागलं.

मेघडंबरीतील 'सेल्फी' भोवली, रितेशला मागावी लागली माफी
SHARES

रुपेरी पडद्यावर शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झालेला अभिनेता रितेश देशमुख याला छत्रपतींच्या भूमिकेत शिरण्यापूर्वीच शिवप्रेमींची माफी मागावी लागली आहे.




कारण काय?

महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रागयडावरील मेघडंबरीत बसून फोटो काढल्यानं रितेशसह दिग्दर्शक रवी जाधव, लेखक विश्वास पाटील यांना शिवप्रेमींच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत रितेशने फोटो काढण्यामागे कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता असं म्हणत वेळीच माफी मागून या प्रकरणाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.


 

रायगडाला भेट

रवी जाधव सध्या रितेशसोबत ‘छत्रपती शिवाजी’ या सिनेमावर काम करत आहेत. यासाठी रवी, रितेश आणि पानिपातकार विश्वास पाटील यांच्यासह सिनेमाच्या टीममधील काही सदस्यांनी रायगडाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी छत्रपतींची मूर्ती असलेल्या मेघडंबरीत बसून फोटो काढले.


 

फोटो व्हायरल होताच...

हे फोटो रितेशने सोशल मीडियावर पोस्ट केले. फोटो व्हायरल होताच शिवप्रेमी संतापले आणि नेटीझन्सनी रितेशवर टीकेची झोड उठवली. वातावरण बिघडत असल्याचं लक्षात येताच रितेशने फोटो काढून टाकत ट्विटरवर माफी मागणारी पोस्ट शेअर केली.


 

मागितली माफी

शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक झाल्यानंतर तिथे बसून फोटो काढण्यामागे कोणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नव्हता. महाराजांच्या पायापाशी कृतज्ञ भावनेतून बसण्याची इच्छा बऱ्याच वर्षांपासून होती. त्यात फक्त भक्तीभाव होता. मात्र आमच्या या कृत्यामुळे कोणी दुखावलं गेलं असेल, तर अंत: करणपूर्वक माफी मागत असल्याची पोस्ट रितेशने फेसबुकवर शेअर केली आहे.



हेही वाचा-

'तो' पुन्हा येतोय माऊलीच्या रूपात!

जेनेलिया सोडून कुणाला म्हणतोय रितेश 'मिस यू'?



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा