Advertisement

जेनेलिया सोडून कुणाला म्हणतोय रितेश 'मिस यू'?


जेनेलिया सोडून कुणाला म्हणतोय रितेश 'मिस यू'?
SHARES

अभिनेता रितेश देशमुख शुटवर असताना सगळ्यात जास्त कुणाला मिस करत असेल? असा प्रश्न कुणी विचारला, तर रितेशने सांगायच्या आधी त्याचं उत्तर येईल 'अर्थात! जेनेलिया, अजून कोण?' पण इथे मात्र काहीतरी भलतंच घडतंय! रितेश फुल्ल पॅक्ड बिझी शेड्युलमध्ये अडकलाय. आणि तो जेनेलियाला मिस न करता भलत्याच कुणालातरी मिस करतोय! हे 'भलतंच' नक्की आहे तरी कोण?


'मिस यू आशिष!'

दिग्दर्शक इंद्रकुमारच्या 'टोटल धमाल' या कॉमेडी चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात झाली आहे. या चित्रपटातील धम्माल मस्ती रितेशने आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. या शुटींगदरम्यानचे फोटो त्याने ट्वीटरवर शेअर केले आहेत. आणि चित्रपटात काम करताना 'मी आशिष चौधरीला मिस करणार' असं रितेशने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.


रितेशची टोटल धमाल!

या फोटोंमधून रितेशचा कॉमेडी अंदाज पुन्हा चाहत्यांसमोर आला आहे. रितशने चित्रपटाच्या क्लॅपबोर्डसोबत एक फोटो शेअर केला आहे. रितश म्हणतो, 'पुन्हा वेडेपणा सुरू! टोटल धमाल. प्रिय मित्र आशिष चौधरीसोबत काम करताना घालवलेला प्रत्येक क्षण मला आठवतोय.'

तर रितेशच्या या ट्वीटला आशिषनेही मस्त रिप्लाय दिलाय. आशिष म्हणतोय, 'एकही सह कलाकार, विशेष करून एकही तुझ्यासारखा मित्र नाहीये. कारण 'धमाल'मध्ये ज्या पद्धतीने आपण धमाल केली, ते कदाचित कुठेच नाही!' आशिष या आगोदर धमाल सिरीजच्या दोन चित्रपटांमध्ये आहे. मात्र 'टोटल धमाल' या चित्रपटात मात्र आशिष काम करत नाहीये.


७ डिसेंबरला रिलीज होणार 'टोटल धमाल'

'टोटल धमाल' ७ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, माधुरी दीक्षित, अनिल कपूर, अरशद वारसी आणि जावेद जाफरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या आधीच्या 'धमाल'मध्ये तुफान कॉमेडी प्रेक्षकांनी अनुभवली. 'टोटल धमाल'मध्येही टोटल धमाल असणार हे रितेशच्या फोटोवरून दिसतंय.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा