गोड चेहऱ्याची अभिनेत्री मृण्मयी देशपांडे नेहमीच काहीतरी नवीन आणि प्रवाहापेक्षा वेगळं करण्याच्या विचारात असते. अभिनयासोबतच दिग्दर्शनाकडंही वळलेली मृण्मयी आता 'मनाचे श्लोक' म्हणणार आहे.
काही दिवसांपूर्वीच 'मुंबई लाइव्ह'नं एक बातमी दिली होती. 'पुन्हा जुळले मृण्मयी-राहुलचे सूर' अशा आशयाच्या या बातमीत मृण्मयी पुन्हा एकदा राहुल पेठेसोबत दिसणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र त्या चित्रपटाचं नाव तेव्हा रिव्हील करण्यात आलं नव्हतं. '१५ ऑगस्ट' या नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटातील ही जोडी एका आगामी मराठी चित्रपटात पुन्हा एकत्र झळकणार असल्याचं रिव्हील करण्यात आलं होतं. आता या चित्रपटाचं नाव समोर आलं आहे.
अभिनयासोबतच या चित्रपटाचं दिग्दर्शनही मृण्मयीच करणार असल्याचं त्यात म्हटलं होतं. 'मनाचे श्लोक' हा तोच चित्रपट आहे. आजवर बऱ्याच मराठी चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या गणराज असोसिएट्सची प्रस्तुती असलेल्या 'मनाचे श्लोक'ची निर्मिती श्रेयस जाधव आणि संजय डावरा करीत आहेत. 'शूटिंग स्टार्टस. बाप्पा मोरया...' असं सोशल मीडियावर लिहीत श्रेयसनंच या चित्रपटाच्या शूटिंगचा श्रीगणेशा करण्यात आल्याचं सांगितलं आहे. या चित्रपटाचा विषय नेमका काय आहे आणि यात आणखी कोणकोणते कलाकार झळकणार याबाबत मात्र सस्पेंस ठेवण्यात आला आहे.
हेही वाचा -
‘जजमेंट’चा थरारक ट्रेलर पाहिला का?
मधुरची नजर 'बॉलिवूड वाइव्स'वर!