Advertisement

‘जजमेंट’चा थरारक ट्रेलर पाहिला का?

‘जजमेंट’चं नेमकं वेगळेपण काय हे चित्रपट पाहिल्यावरच समजेल, पण दमदार अभिनय, उत्कृष्ट कथा आणि संवेदनशील विषय या चित्रपटाच्या जमेच्या बाजू असल्याची जाणीव ट्रेलर पाहिल्यावर होते. अस्तित्वाच्या लढाईसाठी 'तिच्या' जीवघेण्या संघर्षाचं भेदक चित्रण या चित्रपटात दिसणार आहे.

‘जजमेंट’चा थरारक ट्रेलर पाहिला का?
SHARES

मंगेश देसाईची नकारात्मक भूमिका असलेल्या ‘जजमेंट’ या मराठी चित्रपटाचं पहिलं पोस्टर काही दिवसांपूर्वीच रिव्हील करण्यात आलं होतं. या चित्रपटाचा थरारक ट्रेलरही आता प्रदर्शित करण्यात आला आहे.


ऋण कादंबरीवर आधारित

‘जजमेंट’चं कथानक निवृत्त सनदी अधिकारी आणि महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त अशी ओळख असलेल्या प्रसिद्ध लेखिका नीला सत्यनारायण यांच्या ‘ऋण’ या कादंबरीवर आधारित आहे. यापूर्वी ‘श्री पार्टनर’ आणि ‘शुभ लग्न सावधान’ या चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या समीर सुर्वेनं ‘जजमेंट’चं दिग्दर्शन केलं आहे. घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाबाबत उत्सुकता लागली होती. चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर त्यात भर पडली. ‘जजमेंट’च्या थरारक ट्रेलरमुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आपल्या समाजात स्त्रियांवर होणारे अत्याचार हा तसा संवेदनशील विषय आहे.  यावर आधारित अनेक चित्रपट यापूर्वी आले असले तरीही हा चित्रपट मागील सर्व चित्रपटांपेक्षा वेगळं चित्र दाखवणारा असल्याचं ट्रेलर पाहिल्यावर जाणवतं.


जीवघेण्या संघर्षाचं भेदक चित्रण 

‘जजमेंट’चं नेमकं वेगळेपण काय हे चित्रपट पाहिल्यावरच समजेल, पण दमदार अभिनय, उत्कृष्ट कथा आणि संवेदनशील विषय या चित्रपटाच्या जमेच्या बाजू असल्याची जाणीव ट्रेलर पाहिल्यावर होते. अस्तित्वाच्या लढाईसाठी 'तिच्या' जीवघेण्या संघर्षाचं भेदक चित्रण या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं मंगेश देसाई आणि तेजश्री प्रधान या मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या दोन कलाकारांनी प्रथमच एकत्र काम केलं आहे. याखेरीज या चित्रपटात श्वेता पगार, माधव अभ्यंकर, सतीश सलागरे यांच्याही भूमिका आहेत.  डॉ. प्रल्हाद खंदारे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, हर्षमोहन कृष्णात्रेय सह निर्माते आहेत. 

लिंक : https://www.youtube.com/watch?v=zZRG8Pz5jyo&feature=youtu.be



हेही वाचा -

मधुरची नजर 'बॉलिवूड वाइव्स'वर!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा