'तारक मेहता...' मालिकेतील 'या' अभिनेत्रीचेही झाले होते लैंगिक शोषण

  • मानसी बेंडके & मुंबई लाइव्ह टीम
  • मनोरंजन

हॉलिवूड निर्माता हार्वी विनस्टीननं अभिनेत्रींचे लैंगिक शोषण केल्याचा खुलासा झाला आणि सोशल मीडियावर बघता बघता अनेक महिलांनी #MeToo या हॅशटॅगखाली अापले अनुभव शेअर केले. कॉमेडिअन मल्लिका दुआनं देखील यासंदर्भात आपले अनुभव सोशल मीडियावर शेअर केले. यात आता आणखी एक नाव समोर येत आहे. हे नाव तुमच्या परिचयाचे आहे. मुनमुन दत्त असं या अभिनेत्रीचे नाव आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत ती बबिता या नावानं ओळखली जाते.

मुनमुननं इन्स्टाग्राम उकाऊंटवर #MeToo या हॅशटॅगचा फोटो शेअर केरत लैंगिक शोषणासंदर्भातला तिचा अनुभव शेअर केला आहे. त्या आठवणींविषयी पुन्हा विचार करतानासुद्धा त्रास होतो, अशी पोस्ट देखील तिनं केली आहे.

याशिवाय तिनं म्हटलं आहे की, 'माझ्या लहानपणीच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत. मी आमच्या शेजारी राहणाऱ्या काकांना खूप घाबरायचे. मी एकटी असायचे तेव्हा ते मला पकडायचे आणि मी कोणाला याबाबत काही सांगू नये म्हणून धमकवायचे. फक्त शेजारचे काकाच नाही, तर मला शिकवायला येणारे शिक्षक देखील मुलींच्या अंतर्वस्त्रांना हात लावायचे. मुलींना ते शरीराच्या खाजगी भागांवर मारायचे. मी ज्या शिक्षकाला राखी बांधायचे, तेच शिक्षक असले प्रकार करायचे. मला खूप राग यायचा. पण मी लहान होते. त्यामुळे मी कोणाला काहीच सांगितलं नाही.'

कॉमेडिअन मल्लिका दुआनं देखील #MeToo हा हॅशटॅग वापरत कशा प्रकारे आपण लैंगिक शोषणाला बळी पडलो यासंदर्भातला अनुभव शेअर केला होता.

सोशल मीडियावर सुरू झालेल्या या मोहिमेला महिलांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. #MeToo हॅशटॅग अंतर्गत अनेक महिलांनी आपले अनुभव सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि अजूनही शेअर करत आहेत.


हेही वाचा

कॉमेडियन मल्लिका दुआही म्हणते #MeToo!

सेक्स वर्कर्सच्या मुलींची 'लालबत्ती एक्स्प्रेस'!

पुढील बातमी
इतर बातम्या