Advertisement

कॉमेडियन मल्लिका दुआही म्हणते #MeToo!


कॉमेडियन मल्लिका दुआही म्हणते #MeToo!
SHARES

२४ पेक्षा जास्त महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप प्रसिद्ध हॉलिवूड निर्माता हार्वी विनस्टीन यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर ट्वीटरवर सध्या #MeToo या नावानं कॅम्पेन ट्रेंड होत आहे. या कॅम्पेनद्वारे अनेक महिलांनी आपले अनुभव शेअर केले आहेत. आयुष्यात कशा प्रकारे आपल्यालासुद्धा लैंगिक शोषणाचा सामना करावा लागला याची कहाणी अनेक महिलांनी ट्वीट केली आहे.

अमेरिकन अभिनेत्री अॅलिसा मिलानो हिनं लैंगिक शोषणासंदर्भात महिलांना त्यांचा अनुभव शेअर करायला सांगितलं. त्यानंतर अनेक महिलांनी आपले अनुभव ट्वीटरद्वारे मांडले. त्यामुळे #MeToo हा ट्रेंड सध्या ट्वीटरवर सुरू आहे.

कॉमेडिअन मल्लिका दुआ हिनं देखील या कॅम्पेनला पाठिंबा देत आपला अनुभव ट्वीटरवर शेअर केला आहे.  

#MeToo हा हँशटॅग वापरून मल्लिका दुआ म्हणाली, 'माझ्याच गाडीत ही घटना घडली आहे. माझी आई कार चालवत होती. माझ्यासोबतच मागच्या सीटवर तो बसला होता. तो मला आणि माझ्या बहिणीला हात लावत होता. तेव्हा मी ७ वर्षांची होते आणि माझी बहीण ११ वर्षांची होती. माझे वडील दुसऱ्या कारमध्ये होते. त्यांनी त्याला चांगलीच अद्दल घडवली होती.'


अनेक जणींनी करून दिली भावनांना मोकळी वाट

अभिनेत्री दिया मिर्झानं देखील #MeToo ला पाठिंबा दर्शवला आहे. यासोबतच तिनं कार्टूनिस्ट रोहन चक्रवर्ती यांनी काढलेलं कार्टून रिट्वीट केलं आहे. 








हेही वाचा

नजरेनेही होतो बलात्कार !


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा